मुसलमानांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण
त्र्यंबकेश्वर (जिल्हा नाशिक) – येथे १३ मे या रात्री मुसलमानांच्या स्थानिक ऊरूसाच्या निमित्ताने निघालेल्या मिरवणुकीत काही मुसलमानांनी उत्तर महाद्वार येथून श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्याचा हट्ट धरून शिवपिंडीवर हिरवी शाल चढवण्याचा आग्रह धरला होता. तेथील सुरक्षारक्षकांनी मुसलमानांना अडवल्याने पुढील अनर्थ टळला; मात्र याविषयी ऊरूसाचे आयोजक मतीन सय्यद एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलतांना म्हणाले की, त्र्यंबकेश्वर शहरातील उरुसाची परंपरा अनेक वर्षांपासूनची असून त्यातील सेवेकरी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर दरवाजाच्या पायरीजवळ येऊन त्र्यंबकेश्वराला श्रद्धेने धूप दाखवतात आणि पुढे मार्गस्थ होतात. त्या दिवशी आम्ही धूप दाखवण्यासाठी आलो होतो. उत्तर दरवाज्याजवळ जाऊन धूप दाखवण्याचा आग्रह होता. मंदिराच्या गाभार्यात जाण्याचा आमचा प्रयत्न नव्हता; मात्र यंदाच हा वाद का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. मतीन सय्यद यांनी वृत्तवाहिन्यांच्या कॅमेर्यासमोर बोलण्यास टाळाटाळ केली.
सौजन्य साम टीव्ही
गेल्या २ दिवसांपासून त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्यावरून वाद उद्भवला आहे; मात्र हा वाद त्याच दिवशी निवळल्याचे सांगण्यात आले. देवस्थानकडून या प्रकरणाची चौकशी करण्याचे पत्र पोलिसांना दिले. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही बाजूंची सलोखा बैठक घेत वाद अपसमजातून झाल्याचे स्पष्ट करत वाद मिटल्याचे सांगितले. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एस्.आय.टी चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.
संपादकीय भूमिकाइस्लाममध्ये ऊरूस साजरा केला जातो, तर हिंदु धर्मात धार्मिकस्थळी जत्रा भरवली जाते. ऊरूस अन् त्र्यंबेकश्वर मंदिर यांचा काय संबंध ? मुसलमानांनी मंदिरात प्रवेश करण्याचा आग्रह धरणे, हे कोणत्या तत्त्वात बसते ? हिंदू मशिदीत घुसले, तर मुसलमानांना आवडेल का ? पोलिसांनी या प्रकरणात केवळ बघ्याची भूमिका न घेता दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे ! |