राजकीय नेते पैसे देऊन सभांसाठी गर्दी जमावतात ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

१४ मे या दिवशी शास्त्री यांच्या पाटलीपुत्र (बिहार) येथील सभेला ७ लाख हिंदु भाविक होते उपस्थित !

छतरपूर (मध्यप्रदेश) – बागेश्‍वर धामचे धीरेंद्रकृष्ण शास्त्री हे सध्या बिहारची राजधानी पाटलीपुत्र येथे असून तेथे त्यांचे रामकथा सांगण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. १४ मे या दिवशी त्यांच्या सभेला ७ लाख हिंदु भाविक उपस्थित होते. यासंदर्भात शास्त्री यांनी सामाजिक माध्यमांवर पोस्ट करून म्हटले, ‘नेते आणि अभिनेते लोकांना पैसे देऊन गर्दी जमवतात. नेत्यांच्या सभांना गाड्यांवर पैसे खर्च करून गर्दी जमवली जाते. जितकी गर्दी राजकीय पक्षांच्या सभांना येत नाही, त्याच्या दुप्पट लोक हे सभेला आले.’

संपादकीय भूमिका 

राजकीय पक्ष आणि संत यांच्यात हाच भेद आहे ! बहुतांश राजकीय पक्ष जनतेला पैसे, सुविधा आदींचे गाजर दाखवतात, तर हिंदूंचे साधू-संत जनतेला  शाश्‍वत आनंदाच्या अनुभूतीकडे मार्गक्रमण करण्यासाठी साधना सांगतात, हे जाणा !