पैसे गुंतवता किवा न गुंतवता ऑनलाईन ‘रमी’ खेळणे जुगार नाही ! – कर्नाटक उच्च न्यायालय

बेंगळुरू (कर्नाटक) – पत्त्यांमधला ‘रमी’ या खेळात पैसे गुंतवले असले किंवा नसले, तरीही रमी हा खेळ कौशल्याचा आहे, संधीचा नाही. त्यामुळे या खेळाला जुगार म्हणता येणार नाही, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने म्हटले आहे. ऑनलाईन खेळाच्या संदर्भात ‘गेम्सक्राफ्ट’ हे आस्थापन ‘गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स इंजेलिजन्स डायरक्टरेट जनरल’ने जारी केलेल्या २१ सहस्र कोटी रुपयांच्या कराराच्या संदर्भातील नोटिशीवर न्यायालयाने वरील मत मांडले. तसेच या नोटिशीला स्थगिती देत कारणे दाखवा नोटीसही रहित केली आहे.

‘गेमक्राफ्ट’ या ऑनलाईन मोबाईल गेम्स बनवणार्‍या आस्थापनाला ८ सप्टेंबर २०२२ या दिवशी कर आणि सेवा (जीएसटी) अधिकार्‍यांनी एक नोटीस पाठवली होती. यामध्ये २१ सहस्र कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. या नोटिशीला न्यायालयाने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आस्थापनाने न्यायालयात म्हटले की, पैसे गुंतवले असले, तरी कौशल्याच्या जोरावर खेळल्या जाणार्‍या या खेळाला सट्टेबाजी म्हणता येणार नाही; कारण हा खेळ कौशल्याचा आहे.