(म्हणे) ‘पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी व्यासपिठावरून ‘अल्लाहू अकबर’ची घोषणा द्यावी !’ – आमदार इरफान अन्सारी

  • काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले झारखंडमधील आमदार इरफान अन्सारी यांचे फुकाचे आवाहन !

  • ‘मी ‘जय बजरंगबली’च्या घोषणा देत असतो’, असाही अन्सारी यांचा दावा !

(अल्लाहू अकबर म्हणजे अल्ला महान आहे)

बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री व निलंबित आमदार इरफान अन्सारी

जामताडा (झारखंड) – मी प्रत्येक ठिकाणी ‘जय बजरंगबली’ अशा घोषणा नेहमीच देत असतो. जर बागेश्‍वर बाबा (पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री) खरे आहेत, तर त्यांनी सर्व धर्मांचा सन्मान करावा. त्यांच्या व्यासपिठावरून त्यांनी ‘अल्लाहू अकबर’ची  घोषणा द्यावी, असे आवाहन येथील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले आमदार इरफान अन्सारी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना केले आहे. तसेच अन्सारी यांनी आरोप केला की, धीरेंद्रकृष्ण शास्त्री एका विशेष पक्षाचा प्रचार करत आहेत, जे योग्य नाही.

१. सध्या बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री बिहारच्या दौर्‍यावर असून त्यांचे लोकांकडून मोठ्या प्रमाणात स्वागत केले जात आहे. त्यांच्या प्रवचनांना ६ लाखांहून अधिक भाविक उपस्थित रहात आहेत. या वेळी भाजपचे केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी हेही उपस्थित रहात आहेत. या पार्श्‍वभूमीवर आमदार अन्सारी यांनी वरील आवाहन केले आहे.

२. इरफान अन्सारी स्वतः हनुमान भक्त म्हणवून घेतात. त्यांनी यापूर्वी म्हटले आहे, ‘मी  जामताड येथे देशातील सर्वांत भव्य हनुमान मंदिर बांधणार आहे. यासाठी मला माझे मूत्रपिंड विकावे लागले, तरी मी ते विकेन.’

३. इरफान अन्सारी यांनी म्हटले की, भगवान हनुमान माझ्या स्वप्नात आले होते आणि मी त्यांना कर्नाटकात काँग्रेसला विजय मिळावा; म्हणून प्रार्थना केली होती. माझी प्रार्थना पूर्ण झाल्याने माझी हनुमानावरील श्रद्धा आणखी वाढली आहे.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंच्या संतांनी काय करावे आणि काय करू नये, हे अन्य धर्मियांनी त्यांना सांगू नये. त्यांनी त्यांच्या धर्माच्या धर्मगुरूंना सांगावे !
  • मुसलमानांच्या धर्मगुरूंनी जाहीररित्या जिहादी आतंकवाद, लव्ह जिहाद आदींचा निषेध करून दोषींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी करण्यास अन्सारी यांनी त्यांना सांगावे !