कोकण रेल्वे मार्गावर ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ लवकरच धावणार !

लवकरच कोकण रेल्वे मार्गावरून ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ धावणार आहे. तिची चाचणी १६ मे या दिवशी घेण्यात आली. वर्ष २०२३ पर्यंत ७५ वन्दे भारत एक्सप्रेस चालू होणार आहेत.

गोव्यात यंदा ८ जूनला पाऊस : वेधशाळेचा अंदाज

नैऋत्य पाऊस भारतीय उपखंडात ४ जून या दिवशी पोचणार आहे. पाऊस ४ जूनला केरळ किनारपट्टीला धडक देणार आहे, तर ८ ते ९ जूनपर्यंत पाऊस गोव्यात पोचणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

ब्युटी पार्लरच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करू पहाणार्‍या पाद्य्रासह तिघांना अटक

प्रेम आणि शांती यांचा संदेश देणार्‍या पाद्य्रांचे खरे स्वरूप ! भारतभर धर्मांतरविरोधी कायदा करणे का आवश्यक आहे, हे या उदाहरणातून लक्षात येते

गोव्याचा इतिहास पोर्तुगिजांच्या अत्याचारांनी भरलेला आहे, हे स्वीकारा ! 

गोव्याचा इतिहास हा पोर्तुगिजांच्या अत्याचारांनी भरलेला आहे. गोमंतकियांनी हे सत्य स्वीकारले पाहिजे. गोव्यात मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली आणि चर्च बांधण्यात आले. गोव्यात धर्मांतर करण्यात आले.

म्यानमारमध्ये ‘सितवे’ बंदराची निर्मिती करून भारताने चीनला दिले आव्हान !

म्यानमारमध्ये चीनच्या वाढत्या प्रभावाला आता खीळ बसली आहे. भारताच्या साहाय्याने म्यानमारच्या रखाईन प्रांतात ‘सितवे पोर्ट’ नावाचे बंदर चालू करण्यात आले आहे. या माध्यमातून उभय देशांतील व्यापारास प्रोत्साहन मिळणार आहे.

विविध शासकीय योजनांचा जनतेला थेट लाभ देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासन सज्ज !

शासनाच्या योजना आणि उपक्रम यांचा थेट लाभ सर्वसामान्यांना त्वरित मिळावा, हा या अभियानाचा उद्देश आहे. शासनाच्या जवळजवळ दोनशेहून अधिक योजनांचा लाभ या माध्यमातून गरजूंना मिळवून दिला जाणार आहे.

अमेरिकेने स्वतःची १ सहस्र ४१९ अण्वस्त्रे तैनात असल्याची माहिती केली उघड !

रशियानेही त्याच्याकडील तैनात अण्वस्त्रांची माहिती देण्याची अमेरिकेची मागणी !

(म्हणे) ‘भारतात अद्यापही अल्पसंख्यांकांवर आक्रमणे चालूच ! – अमेरिका

अमेरिकेची पुन्हा भारतविरोधी गरळओक !

अवैधपणे होणारी अमली पदार्थ विक्रीच्या विरोधात तातडीने कारवाई करा अन्यथा आंदोलन !

प्रशासनाला अशी चेतावणी का द्यावी लागते ? खरे तर प्रशासनानेच स्वत:हून अमली पदार्थांच्या विरोधात कारवाई करायला हवी !

रत्नागिरी बसस्थानकात प्रवाशांची आरक्षणासाठी होत आहे गर्दी  

आरक्षणाची वेळ होताच तिकीट खिडक्यांवर प्रवासी रांगा लावतात; मात्र खिडकी उघडताच आरक्षण ‘हाऊसफुल्ल’ होत असल्याने रांगेत उभ्या रहाणार्‍या अनेकांना तिकिटाविना माघारी परतावे लागते.