सातार्‍यात पोल्ट्रीमध्ये चालू असणार्‍या पशूवधगृहावर पोलिसांची धाड !

४२ गायींची सुटका, ३० वासरांचे मांस हस्तगत

मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी १९ शुद्धीकरण प्रकल्प बसवणार !

सध्या मुंबई शहर देहलीपेक्षाही सर्वाधिक प्रदूषित म्हणून ओळखले जात आहे. यावर प्रतिबंध म्हणून येथे १९ ‘प्युरिफिकेशन युनिट’ (शुद्धीकरण प्रकल्प) बसवले जाणार आहेत. त्यासमवेत धुक्याचे १४ मनोरेही (स्मॉग टॉवर्स) उभारण्यात येणार आहेत.

खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी प्रवाशांची आर्थिक लूट रोखण्यासाठी परिवहन आयुक्तांनी दिलेल्या आदेशाची तत्परतेने कार्यवाही करा !

कोल्हापूर प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना सुराज्य अभियानाच्या वतीने निवेदन

पालघर येथील साधू हत्याकांडाची होणारी पुनरावृत्ती टळली !

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वनई चंद्रनगर येथे २ साधू मुले पळवायला आले आहेत, अशी अफवा पसरली. ही अफवा पसरल्यानंतर नाथजोगी समाजाच्या २ साधूंवर आक्रमण होण्याच्या आधीच गावातील एका पोलीस मित्राच्या सतर्कतेमुळे त्यांनी साधूंना सुरक्षित ठिकाणी हलवले.

भाविकांचे श्रद्धास्थान असलेला निमणी (जिल्हा सांगली) येथील नवश्या मारुति !

आज चैत्र पौर्णिमा म्हणजे हनुमान जयंती ! तासगाव तालुक्यातील निमणी येथील हनुमान मंदिर पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.

हिंदु युवतीचा मुसलमान कुटुंबियांकडून झालेल्या छळाविषयी योग्य कारवाई करा !  

देशभरात हिंदु युवतींचे ‘लव्ह जिहाद’द्वारे होत असलेले शोषण थांबावे आणि हिंदु युवती अन् पालक यांना याची दाहकता समजावी, यासाठी सकल हिंदु समाज अशा विषयांची नोंद घेत आहे.

संशयित शाहरुख सैफी याला रत्नागिरीतून अटक

२ एप्रिल या दिवशी कन्नूरला जाणार्‍या रेल्वेगाडीत एका अज्ञात व्यक्तीने प्रवेश केला होता. तिने प्रवाशांवर ज्वलनशील पदार्थ टाकून रेल्वेला आग लावली. यात ३ जणांचा मृत्यू झाला, तर ९ जण भाजले होते.

मंदिराला वाचवण्यासाठी नव्हे, तर स्वत:ला वाचवण्यासाठीच खासदार इम्तियाज जलील मंदिरात आले !

श्रीरामनवमीच्या आदल्या दिवशी किराडपुरा भागात झालेला वाद हा २ गटांतील लोकांमुळे झाला होता. त्यामुळे याला हिंदु-मुसलमान वाद म्हणता येणार नाही, असे शिंदे गटाचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी सांगितले.

तळगाव (मालवण जि. सिंधुदुर्ग) येथे होणार्‍या गावठी मद्याच्या अवैध विक्रीवर तात्काळ कारवाई करा !

नागरिकांनी मागण्या किंवा आंदोलने केल्यावरच प्रशासन कृती करणार असेल, तर जनतेने कर भरून असे प्रशासन पोसायचे कशाला ? असे कुणाला वाटल्यास त्यात चूक ते काय ?

समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्यावर गुन्हा नोंद !

भगवान श्रीरामाविषयी आक्षेपार्ह घोषणा