सद्गुरु स्वाती खाडये घेत असलेल्या ‘उपाय सत्संगा’मुळे साधक आणि जिज्ञासू यांच्यात झालेले पालट अन् त्यांना आलेल्या अनुभूती !

सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये साधकांसाठी ४५ मिनिटांचा ‘उपाय सत्संग’ घेतात. यामध्ये देवीकवच आणि रामकवच (टीप) म्हणून घेतले जाते, तसेच भावजागृतीचा प्रयोग घेतला जातो आणि शेवटी समष्टी प्रार्थना केली जाते.

रामनाथी आश्रमात झालेल्या सेतुरक्षक हनुमानाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या वेळी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना आलेल्या अनुभूती

सृष्टीतील रंग दिसण्याची प्रक्रिया केवळ सूर्याच्या भानुशक्तीमुळे होते. मारुतीच्या डोळ्यांत भानुशक्ती जागृत झाल्यामुळे मला ७ रंग दिसले. यातून ‘मूर्ती स्थुलाकडे, म्हणजेच निर्गुणाकडून सगुणाकडे प्रवास करत आहे’, असे मला जाणवले.

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेचा आश्रम पाहून जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय !

आश्रमात मला शांतता जाणवली. येथील साधकांमध्ये सेवाभाव आणि प्रामाणिकपणा जाणवला. येथे सर्वत्र स्वच्छता असल्याने ईश्वरी चैतन्य जाणवले.

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात असलेल्या हनुमानाच्या मूर्तीच्या संदर्भात सौ. रिशिता गडोया यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

रामनाथी आश्रमात हनुमानाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या हनुमानाच्या मूर्तीत इतका जिवंतपणा आहे की, हनुमान प्रत्यक्ष तेथे असल्याचा मला भास होतो.

रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात नामजपासाठी बसलेली असतांना साधिकेला आलेली अनुभूती

मारुतिराया मला सूक्ष्मातून म्हणाले, ‘तू अजूनही स्थुलातच अडकली आहेस का ? अगं, मी सूक्ष्मातून तुझ्याकडेच पहात आहे.’ तेव्हा मला त्याची जाणीव होऊन मी त्याची क्षमायाचना केली.

पू. गोळवलकर गुरुजी, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. हेडगेवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍यांविरोधात गुन्हा नोंद !

सरसंघचालक पू. गोळवलकर गुरुजी, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. केशव हेडगेवार यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करून ते ‘व्हॉट्सॲप’द्वारे प्रसारित केल्याप्रकरणी एन्.आर्.आय. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे, तसेच पुढील चौकशी चालू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल यांनी दिली.

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुखपट्टीचा (मास्क) उपयोग करणे बंधनकारक ! – रूचेश जयवंशी, जिल्हाधिकारी, सातारा

राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत चालला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक पूर्वसिद्धता आणि उपाययोजना करण्याविषयी सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी सूचना केल्या आहेत.

सतत पडणारा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती !

सतत पडणारा पाऊस म्हणजे नैसर्गिक आपत्ती समजली जाईल, असा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. १० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस सलग ५ दिवस पडल्यास ती नैसर्गिक आपत्ती समजली जाईल. हा राज्य सरकारचा शेतकर्‍यांच्या हिताच्या दृष्टीने सर्वांत मोठा निर्णय आहे.

नगरमध्ये २ गटांत दगडफेक, पोलिसांचा कडक बंदोबस्त !

येथील संभाजीनगर महामार्गावरील गजराजनगर परिसरात ४ एप्रिलला रात्री किरकोळ कारणावरून २ गटांत दगडफेक झाली आहे. या वेळी समाजकंटकांनी २ मोटारसायकल जाळत, स्विफ्ट या चारचाकीची तोडफोड केली. दगडफेकीत ५ जण घायाळ झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत.

चैत्र यात्रेसाठी लाखो भाविक उपस्थित !

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने भाविकांसाठी विविध सुविधा !