नवी मुंबईत क्रेडाई-बी.ए.एन्.एम्.च्या ‘प्रॉपर्टी एक्झिबिशन’मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन !

७ ते १० एप्रिल या काळात सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत प्रदर्शन खुले !

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रेक्षकांची हुल्लडबाजी, पोलिसांचा सौम्य लाठीमार !

येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाच्या वेळी प्रेक्षकांनी हुल्लडबाजी केल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. येथील ‘अर्धनारी नटेश्वर यात्रा समिती’च्या वतीने गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे पिता शहाजी महाराज यांच्या कर्नाटक येथील ३५० वर्षे जुन्या समाधीची दुरवस्था

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राजकारण करणार्‍या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी शहाजी महाराज यांचे समाधीस्थळ विकसित न करणे हे लज्जास्पद !

गड-दुर्गांच्या संवर्धनासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही ! – पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा

रायगडासह अन्य गड-दुर्गांचे संवर्धन आणि साकारण्यात येणारे शिवसृष्टीसारखे प्रकल्प यांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्‍वासन राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

तमिळनाडूमध्ये लव्ह जिहाद्याच्या विरोधात तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांची टाळाटाळ !

हिंदुद्वेषी द्रमुकच्या राज्यातील पोलिसांनी लव्ह जिहाद्यांना पाठीशी घातल्यास आश्‍चर्य ते काय ?

आम्ही हिंदु राष्ट्राची नाही, तर रामराज्याची मागणी करतो ! – शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद

आमची मागणी हिंदु राष्ट्राची नाही; कारण कोणतेही प्रारूप नसतांना हिंदु राष्ट्राची मागणी करणे योग्य नाही.

गोरक्षकाची अटक आणि गोतस्कराचा मृत्यू यांमागे षड्यंत्र असून त्याची चौकशी करा ! – श्री. प्रमोद मुतालिक, संस्थापक, श्रीराम सेना

कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असल्याने जर या प्रकरणामागे काही षड्यंत्र असेल, तर त्याची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणणे आवश्यक आहे !

युक्रेनच्या युद्धात अण्वस्त्रे बाजूला ठेवा ! – इमॅन्युअल मॅक्रॉन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन हे सध्या चीनच्या दौर्‍यावर आहेत. तेथे पत्रकार परिषदेत बोलतांना ते म्हणाले की, युक्रेनच्या युद्धात अण्वस्त्रे बाजूला ठेवली पाहिजे.’ रशियाने त्याच्या शेजारील मित्र देश असलेल्या बेलारूसमध्ये अण्वस्त्रे तैनात करण्याच्या केलेल्या घोषणेच्या पार्श्‍वभूमीवर मॅक्रॉन यांनी हे विधान केले.

बेंगळुरू (कर्नाटक) येथे धर्मांध मुसलमानांकडून मंदिरातील नागदेवतांच्या स्थानांची तिसर्‍यांदा तोडफोड !

विश्‍व हिंदु परिषदेकडून करण्यात आलेल्या तक्रारीनंतरही कारवाई नाही !

राज्यघटना बनवतांना असणार्‍या लोकसंख्येच्या ढाच्यामध्ये पालट झाल्यास राज्यघटनेचे अस्तित्व संपुष्टात येईल ! – न्यायमूर्ती स्वामीनाथन्, मद्रास उच्च न्यायालय

‘भारतीय परंपरा आणि धर्म यांचे पालन करणारे लोक असेपर्यंत राज्यघटना अस्तित्वात राहील’, असेही ते म्हणाले.