युक्रेनच्या युद्धात अण्वस्त्रे बाजूला ठेवा ! – इमॅन्युअल मॅक्रॉन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष

बेलारूसमध्ये रशियाकडून करण्यात येणार्‍या अण्वस्त्रांच्या तैनातीवर फ्रान्सचे आवाहन !

मॉस्को (रशिया) – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन हे सध्या चीनच्या दौर्‍यावर आहेत. तेथे पत्रकार परिषदेत बोलतांना ते म्हणाले की, युक्रेनच्या युद्धात अण्वस्त्रे बाजूला ठेवली पाहिजे.’ रशियाने त्याच्या शेजारील मित्र देश असलेल्या बेलारूसमध्ये अण्वस्त्रे तैनात करण्याच्या केलेल्या घोषणेच्या पार्श्‍वभूमीवर मॅक्रॉन यांनी हे विधान केले. त्याला रशियाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहेत. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया जखारोवा यांनी ट्वीट करून म्हटले, ‘मी असे समजण्यास योग्य आहे की, पॅरिसची ही मागणी वॉशिंग्टनसाठी आहे ?’ यासह जखारोवा यांनी दोन छायाचित्रे प्रसारित केली आहेत. यांत अमेरिकेने संपूर्ण युरोपमध्ये अण्वस्त्रे तैनात केल्याच्या चित्राचा समावेश असून ६ देशांची नावेही दिली आहेत. येथे अमेरिकेने ‘यूएस् बी६१’ अण्वस्त्रे तैनात केल्याचा आरोपही त्यांनी केला.