गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रेक्षकांची हुल्लडबाजी, पोलिसांचा सौम्य लाठीमार !

वेळापूर (जिल्हा सोलापूर) – येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाच्या वेळी प्रेक्षकांनी हुल्लडबाजी केल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. येथील ‘अर्धनारी नटेश्वर यात्रा समिती’च्या वतीने गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. (देवतांचे नाव धारण करणार्‍या आणि तेही यात्रा समितीने कोणत्या कार्यक्रमांचे आयोजन केले पाहिजे, हे समजून घेतले पाहिजे. – संपादक) गौतमीचा कार्यक्रम चालू झाल्यानंतर हुल्लडबाजी चालू झाली. या वेळी हुल्लडबाजी करणार्‍यांना ओळखण्यासाठी ड्रोन छायाचित्रकातून चित्रीकरण केले जात असल्याचे सांगितल्यानंतर हुल्लडबाजी न्यून झाली.