वाणिज्य मंत्रालयाकडून हलाल प्रमाणित उत्पादनांसाठी दिशानिर्देश प्रसारित !

केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने हलाल उत्पादने प्रमाणित करून निर्यात करण्याच्या संदर्भात एक आदेश प्रसारित केला आहे. यानुसार हलाल प्रमाणित उत्पादनांसाठी भारतीय गुणवत्ता परिषदेच्या एखाद्या मंडळाच्या मान्यताप्राप्त शाखेकडून वैध प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असणार आहे.

शिवलिंगाचा वैज्ञानिक अभ्यासाविषयी उत्तर न दिल्याने अलाहाबाद उच्च न्यायालयाने भारतीय पुरातत्व विभागाच्या महासंचालकांना फटकारले

न्यायमूर्ती पुढे म्हणाले की, हे प्रकरण अधिक काळ प्रलंबित ठेवता येणार नाही, विशेषत: त्याविषयी देशात सर्वांचे लक्ष आहे.

१५५ देशांतील नद्यांच्या पाण्याद्वारे होणार अयोध्येतील श्रीराममंदिरात जलाभिषेक !

श्रीरामजन्मभूमीवर बांधले जात असलेले भव्य श्रीरामंदिर पूर्ण झाल्यानंतर होणार्‍या मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी जगभरातील १५५ नद्यांच्या पाण्याद्वारे महाजलाभिषेक करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांची खोटी उपस्थिती दाखवण्यासाठी उर्दू शाळेतील मुसलमान मुख्य शिक्षिकेकडून हिंदु शिक्षिकेवर दबाब !

कर्नाटकमील भाजपच्या सरकारने उर्दू शाळांकडून अशा प्रकारे होणारा भ्रष्टाचार शोधून संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !

टि्वटरचे पूर्वीचे चिमणीचे चित्र (लोगो) कायम !

टि्वटरचे सर्वेसर्वा मस्क यांनी टि्वटरचे पूर्वीचे चिमणीचे चित्र (लोगो) कायम ठेवले आहे. काही दिवसांपूर्वीच मस्क यांनी चिमणीचे चित्र पालटून त्याजागी कुत्र्याचे चित्र ठेवले होते.

भाविकांना प्रथमच आदिकैलास पर्वतापर्यंत वाहनाने जाता येणार !

उत्तराखंडच्या पिथौरागड जिल्ह्यात ४ मेपासून आदिकैलास आणि ओम पर्वत यात्रेला आरंभ होत आहे. भाविकांना प्रथमच तवाघाटहून आदिकैलास पर्वत आणि ओम पर्वत येथपर्यंत वाहनाने जाता येणार आहे.

८१ सहस्र डिटोनेटर्स (स्फोटके) आणि २७ सहस्र किलो अमोनियम नायट्रेट यांची तस्करी करणार्‍या २ जिहाद्यांना बंगालमधून अटक !

बंगाल हा जिहादी कारवायांचा अड्डा बनला असून त्यामुळे भारताची सुरक्षा धोक्यात आली आहे. हे लक्षात घेऊन तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणे आवश्यक आहे !

मेरीलँड (अमेरिका) येथील कॅथॉलिक चर्चमध्ये ८० वर्षांत १५० पाद्रयांकडून ६०० मुलांचे लैंगिक शोषण !

अशा घटनांमध्ये एकाही वासनांध पाद्रयाला शिक्षा झालेली नाही ! चर्चच्या कायद्यामुळेच वासनांध पाद्री शिक्षेपासून स्वतःला वाचवू शकत असल्यानेच या कायद्याचा त्यांच्याकडून अपलाभ उठवला जात आहे. त्यामुळे या कायद्यात पालट करण्याची आवश्यकता आहे !

काश्मीरमध्ये ७० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

२ तस्करांना अटक
सज्जाद बडाना आणि जहीर तंच अशी त्यांची नावे आहेत.