गोरक्षकाची अटक आणि गोतस्कराचा मृत्यू यांमागे षड्यंत्र असून त्याची चौकशी करा ! – श्री. प्रमोद मुतालिक, संस्थापक, श्रीराम सेना

गोतस्कराच्या संशयास्पद मृत्यूवरून गोरक्षकांना अटक केल्याचे प्रकरण

श्री. प्रमोद मुतालिक, संस्थापक, श्रीराम सेना

रामनगर (कर्नाटक) – राष्ट्र रक्षण दलच्या गोरक्षकांनी एका वाहनातून गोतस्करी करून गोहत्येसाठी नेण्यात येणार्‍या १६ गायींचे रक्षण केले. तथापि रामनगर पोलिसांनी अवैध गोतस्करी करणार्‍या व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचा खोटा आरोप करून राष्ट्ररक्षण दलाचे गोरक्षक पुनीत केरेहळ्ळी आणि त्यांच्यासह असलेल्या ४ गोरक्षकांना राजस्थानच्या बनस्वार येथे अटक केली. या संदर्भात श्रीराम सेनेचे संस्थापक-अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक पत्रकार परिषदेत म्हणाले की, गोरक्षकांची अटक आणि गोतस्कराचा मृत्यू यांमागे षड्यंत्र असून त्याची चौकशी करणे आवश्यक असल्याची मागणी केली आहे.

श्री. मुतालिक म्हणाले की,

१. गोरक्षकांनी कंटेनरमध्ये असलेल्या गायींची सुटका करून गोमातांचे रक्षण केले आहे. एरव्ही मुसलमानांचा मृत्यू झाल्यावर त्याच्या बाजूने बोलणारे, तसेच ‘आम्ही शेतकर्‍यांच्या बाजूने आहोत’, असे सतत म्हणणारे काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या आणि जनता दल (सेक्युलर) पक्षाचे नेते कुमारस्वामी कंटेनरमध्ये सापडलेल्या गायींविषयी काहीच का बोलत नाहीत ?

२. ही सर्व मंडळी मुसलमानांचे लांगूलचालन करत असून या घटनेमागे षड्यंत्र आहे. ‘कंटेनरमध्ये सापडलेल्या गायी कुठून आल्या होत्या ?’, ‘त्यांना कुठे पळवून नेण्यात येते होते ?’, याचीही चौकशी करावी.


काय आहे प्रकरण ?

पुनीत केरेहळ्ळी आणि त्यांचे सहकारी यांनी गोतस्करी करणारे वाहन अडवले. त्या वाहनातील व्यक्ती तिचे वाहन सोडून पळून गेली होती. नंतर तिचा मृतदेह संशयास्पदरित्या सापडला होता. या प्रकरणी त्याच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीवरून या गोरक्षकांना अटक करण्यात आली.

 (सौजन्य : Daily Salar)

हिंदूंनी सामाजिक माध्यमांवरून पुनीत केरेहळ्ळी यांच्या अटकेविरुद्ध संताप व्यक्त केला आहे.

संपादकीय भूमिका

कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असल्याने जर या प्रकरणामागे काही षड्यंत्र असेल, तर त्याची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणणे आवश्यक आहे !