पृथ्वीवर उतरून हेरगिरी करत आहेत ‘एलियन्स !’ – अमेरिकेची चेतावणी

अमेरिका अज्ञात ‘उडत्या तबकड्या’ (परग्रहवासियांची विमाने) या सिद्धांतावर विश्‍वास ठेवते. अमेरिकेचा विश्‍वास आहे की, एलियन्स अस्तित्वात असून ते सूर्यमालेत आहेत. त्याविषयीच्या संशोधनावर अमेरिका प्रतिवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते.

खलिस्तानवादी अमृतपाल याच्या ४ साथीदारांना आसामच्या कारागृहात ठेवले !

या चौघांना देशद्रोहाच्या कायद्यांतर्गत जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी आता सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

काश्मीरमध्ये मदरशातील मौलानाच्या ८ ठिकाणांवर पोलिसांच्या धाडी !

देशातील सर्वच मदरसे बंद करण्याची आवश्यकता का आहे ? हेच यातून लक्षात येते !

पाकिस्तान सरकार इम्रान खान यांच्या पक्षावर बंदी घालण्याच्या विचारात !

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सरकार माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ पार्टी’वर बंदी घालण्याचा विचार करत आहे.

भारत एक उदयोन्मुख शक्ती ! – इराणचे राजदूत

भारत एक उदयोन्मुख शक्ती असून त्याच्याकडे शक्तीशाली अर्थव्यवस्था आहे. त्यामुळेच भारत सहजपणे पाश्‍चिमात्त्य देशांचा दबाव झुगारू शकतो, असे प्रतिपादन भारतातील इराणचे राजदूत इराज इलाही यांनी केले.

फ्रान्समध्ये शिक्षण घेणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ व्हावी ! – एडोआर्ड फिलिफ, फ्रान्सचे माजी पंतप्रधान

फ्रान्समध्ये भारतातील १० सहस्र विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. भविष्यात या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ व्हावी आणि भारत-फ्रान्स यांच्यातील संबंध आणखी दृढ व्हावेत, असे मत फ्रान्सचे माजी पंतप्रधान आणि ले हाव्रेचे सध्याचे महापौर एडोआर्ड फिलिफ यांनी व्यक्त केले.

पुणे येथे कुख्यात गुंडाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे ‘पोस्टर’ लावणार्‍या तिघांवर गुन्हा नोंद !

पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारीत वाढ झाली असतांना अशाप्रकारे गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणे, हे सरळसरळ कायदा अन् सुव्यवस्थेचे धिंडवडे उडवण्यासारखे आहे !

पर्यटन हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य स्रोत ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे

दुर्दैव म्हणजे काही आमदारदेखील गोव्यात सुरक्षित पर्यटन देण्याचा विचार न करता त्यांच्या वैयक्तिक आणि राजकीय लाभासाठी दलालांना आश्रय देत आहेत. असे करून हे निवडून आलेले लोकप्रतिनिधी गोव्याच्या पर्यटन उद्योगाला उद्ध्वस्त  करत आहेत.

अमृतपाल अटकेत नाही, तर पसार !

अमृतपाल सिंह याला पंजाब पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त सर्वच प्रसारमाध्यमांनी प्रसारित केले होते. पोलिसांकडून दुजोरा देण्यात आला नव्हता आणि ते फेटाळण्यातही आले नव्हते; आता त्याला अटक झालेली नसून तो पसार आहे असे सांगण्यात येत आहे.

पुणे येथील पवनेश्वर मंदिरासमोरील स्वच्छतागृहाची स्वच्छता करण्याची नागरिकांची मागणी !

अशी मागणी नागरिकांना का करावी लागते ? यावरून मंदिरांविषयी प्रशासन किती असंवेदनशील आहे हे दिसून येते !