गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाच्या धार्मिक कृती
गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रथम अभ्यंगस्नान करतात. शरिराला तेल लावून चोळून ते त्वचेत जिरविणे आणि नंतर ऊन (गरम) पाण्याने स्नान करणे म्हणजे अभ्यंगस्नान. अभ्यंगस्नान करतांना देशकालकथन करावे लागते.