खलिस्तानवादी अमृतपाल याच्या ४ साथीदारांना आसामच्या कारागृहात ठेवले !

डावीकडे खलिस्तानी संघटनेचा नेता अमृतपाल सिंह

चंडीगड – पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खलिस्तानी संघटनेचा नेता अमृतपाल सिंह याच्या ४ साथीदारांना अटक करण्यात आली आहे. त्यांना विशेष विमानाने आसामध्ये नेण्यात आले. त्यानंतर त्यांना दिब्रूगड येथील कारागृहात ठेवण्यात आले आहे. पंजाब राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती पहाता खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

संपादकीय भूमिका 

या चौघांना देशद्रोहाच्या कायद्यांतर्गत जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी आता सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !