पुणे – पुणे-बेंगळुरू महामार्गालगत चांदणी चौक परिसरात ‘नीलेश घायवळ युथ फाऊंडेशन’च्या वतीने कुख्यात गुंडाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे ‘पोस्टर्स’ लावण्यात आले. पोलिसांत अनेक गुन्हे नोंद असलेला कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्या संदर्भात हे ‘पोस्टर’ आहेत. त्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. महापालिकेने घटनास्थळावरून अवैध ‘पोस्टर्स’ हटवले आहेत, तर ‘घायवळ युथ फाऊंडेशन’च्या ३ सदस्यांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शिक्षणाचे माहेरघरात काय चाललेय, गुडाच्या वाढदिवसाचे पोस्टर झळकल्याने संतप्त प्रतिक्रियाhttps://t.co/TDzZUPy5bF#Pune #PuneBannerWar #PuneNews #PuneCrimeNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 18, 2023
संपादकीय भूमिकापुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारीत वाढ झाली असतांना अशाप्रकारे गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणे, हे सरळसरळ कायदा अन् सुव्यवस्थेचे धिंडवडे उडवण्यासारखे आहे ! |