फ्रान्समध्ये शिक्षण घेणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ व्हावी ! – एडोआर्ड फिलिफ, फ्रान्सचे माजी पंतप्रधान

फ्रान्सचे माजी पंतप्रधान एडोआर्ड फिलिफ यांचे विधान

ले हाव्रेचे सध्याचे महापौर एडोआर्ड फिलिफ

मुंबई – फ्रान्समध्ये भारतातील १० सहस्र विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. भविष्यात या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ व्हावी आणि भारत-फ्रान्स यांच्यातील संबंध आणखी दृढ व्हावेत, असे मत फ्रान्सचे माजी पंतप्रधान आणि ले हाव्रेचे सध्याचे महापौर एडोआर्ड फिलिफ यांनी व्यक्त केले. या वेळी येथे भारतीय विद्यार्थी उपस्थित होते. एडोआर्ड फिलिप सध्या भारताच्या दौर्‍यावर आहेत. दक्षिण मुंबईमधील सेंट झेवियर्स महाविद्यालयात ‘असंतुलित जगामध्ये संतुलनाचा शोध’ या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी सेंट झेवियर्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे, फ्रान्सचे भारतातील राजदूत इमॅन्युएल लेनन, मुंबईमधील फ्रान्सचे वाणिज्यदूत जीन मार्क सेरे चारलेट उपस्थित होते. ‘भारताची यशाची वाटचाल कायम अशीच राहो’, अशी सदिच्छाही चारलेट यांनी व्यक्त केली.