गोव्यात संरक्षण उत्पादन केंद्र बनण्याची  क्षमता ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोव्याला संरक्षणक्षेत्राला पुरवठा करण्याचे केंद्र बनण्याची चांगली संधी आहे. गोव्यात आधीच वेर्णा येथे जहाजबांधणीसाठी कोकण सागरी क्लस्टर आहे, ज्यामुळे ३ सहस्र रोजगार निर्माण होतील.

मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांची ४ वर्षांची यशस्वी वाटचाल ! – प्रदेश भाजप

डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोव्याला भारतातील सर्वांत विकसित राज्य होण्यासाठी आवश्यक बळ आणि धैर्य त्यांना लाभो, हीच सदिच्छा !

औरंगजेबाच्या समर्थनार्थ भ्रमणभाषवर ‘स्टेटस’ : कोल्हापूर जिल्ह्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंद !

औरंगजेबाचे समर्थन करणार्‍यांनी ‘औरंगजेबी कृत्ये’ करू नयेत, यासाठी त्यांच्यावर आताच कठोर कारवाई करा !

महाराणी येसूबाई यांची समाधी सापडली !

सापडलेली कागदपत्रे आणि हरिनारायण मठाच्या जागेची स्थान निश्चिती करतांना चतु:सीमा दाखवतांना आढळलेला ठोस पुरावा यांवरून ही समाधी महाराणी येसूबाई यांचीच आहे, हे निश्चित करता आले.

‘बारामती ऍग्रो’ कारखान्यांच्या संचालकांवर गुन्हा नोंद !

इंदापूर तालुक्यातील शेटफळ येथील ‘बारामती ॲग्रो’ कारखान्याच्या संचालकांविरुद्ध वेळेअगोदर उसाचा गळीत हंगाम चालू केल्याप्रकरणी गुन्हे नोंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जुन्या निवृत्तीवेतन योजनेच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेतील कर्मचारी संघटना एकवटल्या !

जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी, या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत कार्यरत असलेल्या १८ संघटना एकत्रित येऊन त्यांनी १७ मार्च या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

महापुरुषांचा अवमान करणार्‍याच्या विरोधात तक्रार देणार्‍या स्वानंद पाटील यांच्यावर प्राणघातक आक्रमण !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकत्र येऊन आक्रमणकर्त्यांवर कडक कारवाई न केल्यास उग्र आंदोलन छेडण्याची चेतावणी दिली आहे. शहरात तणावपूर्ण वातावरण असून शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनार्थ आज ‘सकल हिंदु समाजा’चा भव्य मोर्चा !

देशाचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला समर्थन देण्यासाठी हा मोर्चा आहे’, अशी भावना सर्वांनी व्यक्त केली.

इयत्ता दहावी आणि बारावी यांच्या परीक्षांमध्ये सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद !

सर्वाधिक ३ गुन्हे अमरावती विभागात, प्रत्येकी २ गुन्हे पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर विभाग, तर १ गुन्हा मुंबई विभागीय कार्यालयांतर्गत नोंद झाले आहेत. यावर्षी सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाल्याची माहिती राज्य मंडळाने दिली आहे.

शीख परंपरेतील आध्यात्मिक अधिकारी असलेले संत कर्नल के.एस्. मजेथिया यांची सनातनच्या रामनाथी आश्रमाला सदिच्छा भेट !

शीख पंथीय गुरु गोविंदसिंग यांच्या परंपरेतील आध्यात्मिक अधिकारी असलेले संत कर्नल के.एस्. मजेथिया यांनी १६ मार्च या दिवशी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांच्या समवेत त्यांचे अनुयायी श्री. कुलदीप सिंग आणि त्यांची पत्नी सौ. किरण सिंग आदीही होते.