भारत एक उदयोन्मुख शक्ती ! – इराणचे राजदूत

तैवान किंवा दक्षिण कोरिया नाही, तर भारत पश्चिमेविरुद्ध उभे राहण्यास सक्षम आहे : इराणचे राजदूत इराज इलाही

नवी देहली – भारत एक उदयोन्मुख शक्ती असून त्याच्याकडे शक्तीशाली अर्थव्यवस्था आहे. त्यामुळेच भारत सहजपणे पाश्‍चिमात्त्य देशांचा दबाव झुगारू शकतो, असे प्रतिपादन भारतातील इराणचे राजदूत इराज इलाही यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, जगाचा दबाव झुगारून भारताने रशियाकडून तेलाची आयात चालूच ठेवली आहे. भारत अशीच ठाम भूमिका सदैव घेईल, याची निश्‍चिती आहे.