पाकिस्तान सरकार इम्रान खान यांच्या पक्षावर बंदी घालण्याच्या विचारात !

खान यांच्या घरातून शस्त्रसाठा जप्त

डावीकडून माजी पंतप्रधान इम्रान खान आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सरकार माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ पार्टी’वर बंदी घालण्याचा विचार करत आहे. या संदर्भात पाकचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी सांगितले की, इम्रान खान यांच्या पक्षावर बंदी घालण्याच्या संदर्भातील प्रक्रिया चालू करण्याविषयी सरकार तज्ञांशी चर्चा करण्याचा विचार करत आहे. इम्रान खान यांच्या घरात आतंकवादी लपले होते. तेथे शस्त्रे, पेट्रोल बाँब आदी जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्या पक्षावर बंदी घालण्यासाठी हे पुरेसे पुरावे आहेत. कोणत्याही पक्षावर बंदी घालणे, ही एक न्यायालयीन प्रक्रिया आहे. याविषयी कायदेतज्ञांशी चर्चा करण्यात येईल.