पापी औरंग्या या देशाची संतान असू शकत नाही ! – शिवराय कुळकर्णी, प्रवक्ते, भाजप

औरंगजेबाने येथील माती आणि माता-भगिनी यांच्यावर अत्याचार केले. तलवारीच्या धाकावर धर्मांतर केले. जुलमी राजवट चालवली. मंदिरे फोडली. परकीय आक्रमक पापी औरंगजेब या देशाची संतान असू शकत नाही.

बुलढाणा येथील समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात ६ जण ठार !

अपघात १२ मार्च या दिवशी सकाळी झाला. चारचाकी वाहन हे रस्त्याच्या मधोमध असलेल्या ‘डिव्हायडर’मध्ये घुसून ३-४ पलट्या मारून दुसर्‍या बाजूच्या रस्त्यावर उलटले.

नागपूर येथे भिकार्‍यांविरुद्ध जमावबंदी आदेश लागू !

पोलिसांनी १५० भिकार्‍यांना कह्यात घेऊन त्यांच्या मूळ गावी सोडले. यात ३० मुले, ४० महिला आणि ८० पुरुष यांचा समावेश आहे.

सिंधुदुर्ग : असुविधांच्या निषेधार्थ माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारावर गुरे बांधून आंदोलन !

आरोग्य सुविधेसारख्या मूलभूत आवश्यकतांसाठी आंदोलन करावे लागणे, प्रशासनाला लज्जास्पद !

दहिसर पोलिसांकडून दोघांना अटक; गुन्हा नोंद !

शीतल म्हात्रे यांच्या तक्रारीवरून दहिसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला होता. अशोक मिश्रा आणि मानस कुवर अशी अटक आरोपींची नावे आहेत.

गोव्यात शिवोली येथे दुभत्या गायीची हत्या : दुष्कृत्याविषयी सर्वत्र संताप व्यक्त

एका ‘सीसीटीव्ही’वरील चित्रीकरणात दोन्ही संशयित शेतातून एका पिशवीत काहीतरी घेऊन जातांना दिसत होते. यावरून संशय बळावला. संशयितांनी गोहत्या केल्याचे मान्य केले आहे. पोलिसांनी दोन्ही संशयितांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट केला आहे.

म्हादईचे पाणी मलप्रभेत वळवल्याविना गप्प बसणार नाही ! – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

म्हादईसाठी मी २६५ कि.मी. पदयात्रा काढली. त्यामुळे केंद्र सरकारने याची नोंद घेतली. केंद्रातील डॉ. मनमोहन सिंह सरकारने म्हादईचे पाणी कर्नाटकला देण्यास नकार दिला, तर केंद्रातील विद्यमान मोदी सरकारने म्हादईची वाट मोकळी केली आहे.

गोव्यात ३९ दिवसांमध्ये आगीच्या १ सहस्र ३०० दुर्घटना : ८व्या दिवशीही आगीच्या दुर्घटना चालूच !

आग अजूनही सक्रीय आहे. आग विझवण्यासाठी अग्नीशमन दल, वन खाते, भारतीय वायू सेना, नौसेना आणि स्थानिक नागरिक शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

विज्ञान सर्वव्यापी अध्यात्माच्या घरी परत येईल !

‘विज्ञान हे अध्यात्मशास्त्राचे एक भरकटलेले पिल्लू आहे. आज ना उद्या ते सर्वव्यापी अध्यात्माच्या घरी परत येईल आणि त्याच्याशी एकरूप होईल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

येलवडी (जिल्हा पुणे) गावात अवैध मद्य-मांस विक्री करणार्‍यांवर कारवाई करा ! – राष्ट्रीय वारकरी परिषद

मौजे येलवडी गावात वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे. तसेच जवळच असलेल्या श्री क्षेत्र देहू आणि भंडारा देवस्थान यांमुळे भाविक-भक्त यांची येथे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.