कुडाळ – तालुक्यातील माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला असल्याच्या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी ग्रामस्थांसह ११ मार्च या दिवशी आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारावर गुरे बांधून आंदोलन केले.
या वेळी योगेश धुरी यांनी सांगितले की, या भागातील २४ गावांचे आरोग्य माणगाव आरोग्य केंद्रावर अवलंबून आहे. आरोग्य यंत्रणा मात्र ‘व्हेंटिलेटर’वर आहे. आरोग्य केंद्रात खोकला, ‘टीटी’चे इंजेक्शन, कॅल्शियमच्या गोळ्या, रक्तदाबाच्या गोळ्या उपलब्ध नाहीत. सर्व औषधे बाहेरून आणावी लागतात, मग आरोग्य केंद्र हवे तरी कशाला ? अधिकारी, डॉक्टर आणि कर्मचारी यांना ग्रामीण भागातील जनतेशी काही देणे-घेणे नाही. अधिकार्यांचा दूरभाष लागत नाही आणि लागला, तर तो उचलला जात नाही. हे महाराष्ट्र सरकारचे दुर्दैव आहे. (या आंदोलनाची, तसेच धुरी यांनी केलेल्या आरोपांची आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करायला हवी ! – संपादक)
संपादकीय भूमिकाआरोग्य सुविधेसारख्या मूलभूत आवश्यकतांसाठी आंदोलन करावे लागणे, प्रशासनाला लज्जास्पद ! |