दहिसर पोलिसांकडून दोघांना अटक; गुन्हा नोंद !

आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या ‘मॉर्फ’ चित्रफीतीच्या प्रसारणाचे प्रकरण

मुंबई – शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांची सामाजिक माध्यमांवर ‘मॉर्फ’ (मूळच्या चलचित्रात पालट करणे) केलेली चित्रफीत प्रसारित केल्याप्रकरणी दहिसर पोलिसांनी दोघांना अटक केली. शीतल म्हात्रे यांच्या तक्रारीवरून दहिसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला होता. अशोक मिश्रा आणि मानस कुवर अशी अटक आरोपींची नावे आहेत.

श्रीकृष्णनगर परिसरात शनिवारी रात्री विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. त्या वेळी रॅली आणि सभा यांचे आयोजन मागाठाणे मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्याकडून करण्यात आले. त्यातील चित्रफीत ‘मॉर्फ’ करून व्हायरल करण्यात आल्याने शीतल म्हात्रे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.