येलवडी (जिल्हा पुणे) गावात अवैध मद्य-मांस विक्री करणार्‍यांवर कारवाई करा ! – राष्ट्रीय वारकरी परिषद

येलवडी ग्रामपंचायतीकडून राष्ट्रीय वारकरी परिषदेला दिलेले पत्र

येलवडी (जिल्हा पुणे) – मौजे येलवडी गावात वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे. तसेच जवळच असलेल्या श्री क्षेत्र देहू आणि भंडारा देवस्थान यांमुळे भाविक-भक्त यांची येथे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तीर्थक्षेत्र ‘क’ दर्जा प्राप्त असलेल्या येलवडी गावात अवैध मद्य, मांस, मटण, मच्छी व्यवसाय चालू आहेत. त्यामुळे ग्रामस्थांच्या मागणीवरून विषयावर ग्रामसभेत ठराव संमत करण्यात आला. तसेच याविषयी ग्रामपंचायतीकडून राष्ट्रीय वारकरी परिषदेस पत्राद्वारे विनंती करण्यात आली. त्यानंतर येलवडी गावात अवैध मद्य, मांस, मटण विक्री करणार्‍या संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रीय वारकरी परिषद आणि येलवडी ग्रामस्थ यांच्या वतीने निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना करण्यात आली. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वत:हून कारवाई का करत नाही ? – संपादक)