खासदार इम्तियाज जलील यांनी ‘जलील’ होण्याआधीच उपोषण मागे घेण्याची मागणी !
संभाजीनगर – भारतात आणि महाराष्ट्रात ‘औरंगजेब कि छत्रपती संभाजी महाराज ?’, असा विषय येईल, तेव्हा या देशातील मातीचा कणकण ‘छत्रपती संभाजी महाराज’ यांचेच नाव घेईल. औरंगजेबाने येथील माती आणि माता-भगिनी यांच्यावर अत्याचार केले. तलवारीच्या धाकावर धर्मांतर केले. जुलमी राजवट चालवली. मंदिरे फोडली. परकीय आक्रमक पापी औरंगजेब या देशाची संतान असू शकत नाही, असा घणाघात भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी पत्रकारांशी बोलतांना केला. ‘या देशाचे खरे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज आहेत’, असेही त्यांनी सांगितले.
औरंगाबाद जिल्ह्याचे नाव पालटून छत्रपती संभाजीनगर झाले आहे. केंद्र सरकारकडून या निर्णयाला अधिकृत अनुमती दिल्यानंतर या निर्णयाच्या विरोधात ‘एम्.आय.एम्.’ पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण चालू केले आहे. या उपोषणावर कुळकर्णी यांनी टीका केली. शिवराय कुळकर्णी म्हणाले की, ‘एम्.आय.एम्.’ पक्ष आणि इम्तियाज जलील यांनी अधिक ‘जलील’ होण्याआधी आपले उपोषण मागे घ्यावे आणि ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’ असे म्हणत शहराच्या नामांतराला पाठिंबा द्यावा.
इस्लामी अत्याचार :