‘आय.एम्.एफ्.’चा पाकिस्तानवर विश्‍वास नाही ! – पाकचे माजी अर्थमंत्री इस्माईल

आंतरराष्ट्रीय नाणे निधीचा (आय.एम्.एफ्.चा) पाकिस्तानवरील विश्‍वास उडाला आहे, असे वक्तव्य पाकिस्तानचे माजी अर्थमंत्री मिफ्ताह इस्लाईल यांनी केले. मागील वर्षी आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडून पाकला कर्ज देणे थांबवले होते.

पुरातन मंदिरे आणि वास्तू यांना धक्का न लावता पंढरपूर ‘कॉरिडोर’चे काम करू ! – महाराष्ट्र शासन

श्रीक्षेत्र पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या परिसराच्या विकासासाठी करण्यात येणार्‍या ‘कॉरिडोर’च्या कामाविषयी वारकरी, मंदिर समिती, स्थानिक नागरिक, व्यापारी, लोकप्रतिनिधी, दिंडीकरी यांच्या समवेत शासनाची बैठक पार पडली. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केल्याचे विधानमंडळाच्या कार्यालयाकडून परिपत्रक !

अशा हास्यास्पद गंभीर चुका करणारे प्रशासन राज्यकारभार कसा करत असेल, याची कल्पना येते !

‘एच्.३ एन्.२’ तापाने महाराष्ट्र बाधित न होण्यासाठी सरकारने तात्काळ उपाययोजना करावी ! – विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी

केंद्र सरकारच्या अखत्यारीतील नीती आयोगाच्या बैठकीनंतर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी ‘एच्.३ एन्.२’ तापाच्या संदर्भात काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. या ‘एच्.३ एन्.२’ तापाचा प्रसार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात वाढत आहे.

शेतकर्‍यांच्या आत्महत्येप्रकरणी महाविकास आघाडीतील आमदारांचे आंदोलन !

शेतकर्‍यांच्या आत्महत्येची टिंगल करणार्‍या कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा धिक्कार असो’, ‘कृषीमंत्र्यांचा धिक्कार असो’, ‘५०० कोटी रुपयांचा घोटाळा करणारे आमदार राहुल कुल यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे’ अशा घोषणा देऊन महाविकास आघाडीच्या आमदारांनी १३ मार्च या दिवशी विधानभवनाच्या पायर्‍यांवर आंदोलन केले.

आमदार प्रकाश सुर्वे-शीतल म्हात्रे ‘मॉर्फ’ व्हिडिओवरून सभागृहात गदारोळ !

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक आक्षेपार्ह ‘मॉर्फ’ व्हिडिओ ११ मार्च या दिवशी रात्री प्रसारित करण्यात आला होता. १३ मार्च या दिवशी या प्रकरणाचे पडसाद विधानसभेत उमटले.

सिंधुदुर्ग : आरोस आणि सोनाळी येथे वणव्यामुळे हानी

या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि वनविभागाचे अधिकारी यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या वेळी काही प्रमाणात वनसंपत्तीची हानी झाली; मात्र जवळील आंबा आणि काजू बागायती वाचवण्यात यश आले.

गेल्या ५ वर्षांत आश्रमशाळांमधील ९६२ विद्यार्थी दगावले ! – आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित

‘समर्थन’ या संस्थेसह विद्यार्थ्यांच्या पालकांनी ‘मुलांचा आजार बळावल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात येते’, असे नमूद केले. तसेच ‘ज्या पाड्यांमध्ये आरोग्यव्यवस्था उपलब्ध नाही, तिथे शेवटच्या क्षणी विद्यार्थ्यांवर उपचार कसे करणार ?

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करणार ! – नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री

देहू, आळंदी, पंढरपूर ही महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्रे आहेत. हा भक्तीमार्ग उत्कृष्ट असावा. ज्ञानेश्वरीत उल्लेख असलेले वृक्ष लावण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

कृष्णा नदीच्या काठावर लाखो माशांच्या मृत्यू प्रकरणी ‘दत्त इंडिया साखर कारखान्या’ला नोटीस !

रसायनमिश्रीत मळीचे दूषित पाणी सोडल्याने कृष्णा नदीच्या पाण्याला दुर्गंधी सुटली असून शिरोली तालुक्यातील, तसेच अंकली परिसरातील गावांना प्रदूषित पाणी प्यावे लागल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.