लाहोर (पाकिस्तान) येथील महाभारतकालीन ‘पंजतीर्थ’ हे हिंदु तीर्थक्षेत्र मुसलमानांच्या कह्यात !

गोदाम म्हणून होत आहे वापर !

पेशावर (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या खैबर-पख्तूनख्वा प्रांताची राजधानी असलेले पेशावर येथील महाभारतकालीन पंजतीर्थ (पंज तीरथ) हे हिंदूंचे तीर्थक्षेत्र मुसलमानांनी कह्यात घेतले असून त्याचा वापर गोदामासाठी केला जात आहे. स्थानिक वर्तमानपत्र ‘बिटर विंटर’ने यासंदर्भात वृत्त प्रसारित केले आहे.

१. पांडवांशी पंजतीर्थचा संबंध आहे. सहस्रो वर्षे या स्थानाचा हिंदूंचे तीर्थक्षेत्र म्हणून नावलौकिक होता. फाळणीनंतर येथे जीर्णावस्थेत असलेली केवळ २ मंदिरे शिल्लक राहिली आहेत.

२. हे क्षेत्र स्थानिक सरकारच्या हातातून निसटून चाका यूनुस कुटुंबाच्या नियंत्रणात गेले. पुढे एका खासगी आस्थापनाला ही जागा विकण्यात आली.

३. पंजतीर्थामध्ये पाण्याचे ५ तलाव, तसेच १ मोठे आणि काही छोटी मंदिरे होती. कार्तिक मासात हिंदू येथील तलावांत स्नान करत आणि येथील झाडांच्या खाली बसून पूजाअर्चा करत.

४. पुरातत्व तज्ञांचे म्हणणे आहे की, जेव्हा त्यांनी या तीर्थक्षेत्रापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा शस्त्रास्त्रे असलेल्या लोकांनी त्यांनी धमकावून पळवून लावले.

५. १० फेब्रुवारी या दिवशी पेशावर उच्च न्यायालयाने यावर खंत व्यक्त केली की, ३ वर्षे होऊनही या सूत्रावर कोणताच उपाय योजला गेलेला नाही. या सूत्रावर न्यायालयात अजूनही सुनावणी चालू आहे.

संपादकीय भूमिका 

भारतात हिंदूंची मंदिरे पाडून तेथे मशिदी उभारण्याचे काम चालू आहे, तर पाकमध्ये मंदिरांचा गोदामे म्हणून वापर होत आहे ! हिंदूंच्या मंदिरांची देश-विदेशांत होणारी ही विटंबना रोखण्यासाठी सरकार पावले उचलणार का ?