राष्‍ट्रपती राजवट कुणाच्‍या सांगण्‍यावरून लागली ? हेही शरद पवार यांनी स्‍पष्‍ट करावे ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री

मुंबई – महाराष्‍ट्रात राष्‍ट्रपती राजवट कुणाच्‍या सांगण्‍यावरून लागली ? त्‍यामागे काय होते ? याचेही स्‍पष्‍टीकरण शरद पवार यांनी द्यावे, असे आवाहन उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्‍यमांच्‍या प्रतिनिधींशी बोलतांना केले. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्‍या मुलाखतीमध्‍ये ‘अजित पवार यांच्‍या समवेत घेण्‍यात आलेल्‍या शपथविधीविषयी शरद पवार यांना माहिती होती’, असा गौप्‍यस्‍फोट केला होता. त्‍यावर शरद पवार यांनी ‘महाराष्‍ट्रातील राष्‍ट्रपती राजवट उठावी’, यासाठी अजित पवार यांचा शपथविधी करण्‍यात आल्‍याचा गौप्‍यस्‍फोट केला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी वरील वक्‍तव्‍य करून महाराष्‍ट्रात राष्‍ट्रपती राजवट लागण्‍यामागे एकप्रकारे शरद पवार यांच्‍याकडे अंगुलीनिर्देश केला आहे.