अंगणवाडी सेविकांच्‍या संपामुळे बालके पोषण आहारापासून वंचित !

मुंबई – महाराष्‍ट्र राज्‍य अंगणवाडी कृती समितीच्‍या वतीने अंगणवाडी कार्यकर्ती आणि साहाय्‍यक यांनी विविध मागण्‍यांसाठी राज्‍यभरात २० फेब्रुवारीपासून बेमुदत संप पुकारला आहे. संपाच्‍या तिसर्‍या दिवशीही तोडगा निघालेला नाही. संपामुळे अंगणवाड्या बंद असल्‍याने ६ वर्षांपर्यंतची बालके पोषण आहारापासून वंचित रहात आहेत.

वेतनश्रेणी लागू करणे किंवा मानधनात वाढ करणे, नवीन भ्रमणभाष उपलब्‍ध करून देणे, निवृत्ती वेतन लागू करणे आदी प्रमुख मागण्‍यांसाठी संप पुकारण्‍यात आला आहे.

संपामुळे गर्भवती आणि स्‍तनदा मातांचा आहार, ० ते ३ वर्षे वयोगटातील मुलांचा आहार, ३ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांचा आहार बंद झालेला आहे.

संपादकीय भूमिका 

बालकांच्‍या आरोग्‍याशी खेळण्‍यापेक्षा वैध मार्गाने आपल्‍या मागण्‍या मान्‍य करण्‍यासाठी प्रयत्न करावेत !