मी ख्रिस्ती असलो, तरी माझे हिंदु धर्मावर प्रेम आहे ! – सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के. एम. जोसेफ

सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के. एम. जोसेफ

नवी देहली – मी ख्रिस्ती असलो, तरी माझे हिंदु धर्मावर प्रेम आहे. तो एक महान धर्म आहे आणि त्याला किरकोळ समजू नये, असे विधान सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायामूर्ती के. एम. जोसेफ यांनी २७ फेब्रुवारीला एका याचिकेवरील सुनावणीच्या वेळी केले. भाजपचे नेते आणि अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय यांनी देशातील परकीय आक्रमकांची नावे पालटण्यासाठी ‘रिनेमिंग कमिशन’ची (नावात पालट करणार्‍या आयोगाची) स्थापना करण्याची मागणी करणारी याचिका प्रविष्ट केली होती. त्या वेळी न्यायमूर्ती जोसेफ यांनी वरील विधान केले. त्यांनी ही याचिका फेटाळून लावली.

१. न्यायमूर्ती जोसेफ म्हणाले की, हिंदु धर्म ज्या उंचीवर पोचला आहे आणि वेद, उपनिषद अन् भगवद्गीता यांमध्ये जे सांगितले आहे, त्यापर्यंत कोणतीही व्यवस्था पोचू शकलेली नाही. हिंदु धर्माने अध्यात्मिक ज्ञानाला उंचीवर नेले आहे. आपल्याला या महान धर्माविषयी गर्व असला पाहिजे. त्याला कमी लेखू नये.

२. या वेळी न्यायमूर्ती जोसेफ यांनी अधिवक्ता उपाध्याय यांना डॉ. एस्. राधाकृष्णन् यांचे पुस्तक वाचण्याचा सल्ला दिला. तसेच ते म्हणाले की, मीसुद्धा ते वाचत आहे. केरळमधील अनेक राजांनी चर्च, तसेच अन्य धार्मिक स्थळांसाठी भूमी दान केली होती. (विदेशातील किती ख्रिस्ती राजांनी हिंदूंच्या धार्मिक स्थळांना दान किंवा भूमी दिली आहे ? गोव्यात तर पोर्तुगिजांनी हिंदूंची शेकडो मंदिर पाडली आणि सहस्रो हिंदूंना बलपूर्वक बाटवले, हाच इतिहास आहे ! – संपादक)

हे ही वाचा –

तुम्‍हाला देश कायम अशांत ठेवायचा आहे का ?
https://sanatanprabhat.org/marathi/657815.html

संपादकीय भूमिका

हिंदु धर्म महान असला, तर हिंदूंना त्याचे ज्ञान नाही. त्यांना धर्मशिक्षण दिले जात नसल्याने त्यांना याची माहिती नाही आणि त्यामुळेच हिंदु तरुणी लव्ह जिहादला बळी पडतात, गरीब हिंदू ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या आमिषाला बळी पडून धर्मांतर करतात !