लक्ष्मणपुरी – उत्तरप्रदेश सरकारकडून चालवण्यात येणारे ‘रामकथा संग्रहालय’ ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’कडे सोपवण्यात येणार आहे. यासंबंधीचा करार ट्रस्ट आणि सरकार यांच्यात करण्यात येणार आहे. श्रीरामजन्मभूमी हिंदूंना परत मिळण्यासाठी प्रदीर्घ न्यायालयीन लढा देण्यात आला. त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे न्यायालयाला सादर करण्यात आली होती.
ट्रस्टने हे संग्रहालय कह्यात घेतल्यानंतर ही कागदपत्रे जनतेसाठी खुली करण्यात येतील, तसेच श्रीरामजन्मभूमीच्या ठिकाणी उत्खनन केल्यानंतर सापडलेल्या कलाकृतीही सर्वांना पहाण्यासाठी खुल्या करण्यात येणार आहेत. सध्या उत्तरप्रदेश सरकारचा सांस्कृतिक विभाग ‘रामकथा संग्रहालय’ चालवतो.