‘देव संस्कृती विश्वविद्यालय (हरिद्वार)’चे कुलगुरु डॉ. चिन्मय पंड्या यांची सनातन संस्थेच्या साधकांनी घेतली सदिच्छा भेट !
सनातनच्या साधकांनी डॉ. पंड्या यांना ‘धर्मशिक्षा फलक’ हा हिंदी भाषेतील ग्रंथ भेट दिला. ग्रंथाचे मुखपृष्ठ पाहून गौरवोद्गार काढतांना डॉ. पंड्या म्हणाले, ‘‘अतिशय सुंदर, महत्त्वाचा संदेश देणारे आणि अर्थपूर्ण मुखपृष्ठ आहे.’’
भिवंडी येथे ‘मेरी पाठशाळा’ आंदोलनात विद्यार्थ्याकडून ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !
भारतात राहून पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा गांभीर्याने विचार करायला हवा !
(म्हणे) ‘औरंगजेब क्रूर आणि हिंदुद्वेष्टा असता, तर त्याने विष्णूचे मंदिरही फोडले असते !
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे हिंदुद्वेषी विधान ! लेखक आणि व्याख्याते दुर्गेश परुळकर यांचा उपहासगर्भ अभिप्राय ! हिंदुत्वनिष्ठ संतप्त.
‘एन्.आय.ए.’च्या न्यायालयात चालू असलेल्या मालेगाव बाँबस्फोटाच्या खटल्याला स्थगिती देणार नाही ! – मुंबई उच्च न्यायालय
मालेगाव बाँबस्फोट प्रकरण, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना सत्र न्यायालयाकडून दिलासा नाही !
कर्तव्यात कसूर करणार्या पोलीस निरीक्षकांवर कारवाई करा ! – विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल
हिंदु धर्म आणि देवता यांच्या विरोधात वक्तव्य करणार्यांवर काहीही कारवाई न करणारे पोलीस हिंदुद्रोहीच आहेत !
विधानसभेत संमत झालेले ‘लोकायुक्त’ विधेयक विधान परिषदेत प्रलंबित !
ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णा हजारे हे गेली ११ वर्षे लोकायुक्त विधेयक आणण्यासाठी धडपड करत आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने हिवाळी अधिवेशनाच्या काळात विधानसभेत हे विधेयक एकमताने संमत केले; मात्र उद्धव ठाकरे गटाने हे विधेयक विधान परिषदेत प्रलंबित ठेवले आहे.
स्वराज्य आणि स्वधर्म यांसाठी बलीदान केलेल्या हिंदु छाव्याचे धर्मवीर पद नाकारणे, हा हिंदूंचा अपमान ! – हिंदु महासभा
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, असे वक्तव्य केले होते. त्याचे पडसाद आता उमटत आहेत.
सुशांतसिंह राजपूत याच्या हत्येमागील सत्य लवकरच बाहेर येईल ! – आमदार नीतेश राणे, भाजप
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची हत्या झाल्याचे मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो. याचे पुरावे हळूहळू बाहेर पडत आहेत. सुशांतसिंह राजपूत याची हत्याच झाली आहे. यामागील सत्य लवकरच बाहेर येईल, असे वक्तव्य भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी केले आहे.
मराठी विश्व संमेलनात विदेश आणि परराज्य येथील मराठीप्रेमींना एका व्यासपिठावर आणणार ! – दीपक केसरकर, मराठी भाषामंत्री
ते म्हणाले, ‘‘६५ वर्षांत असा कार्यक्रम कुणी केला नाही. यावर्षी मर्यादित आर्थिक निधीमध्ये संमेलन करत आहेत. पुढील वेळी अधिक निधी देण्यात येईल. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी प्राप्त झालेले नवीन पुरावे आम्ही केंद्रशासनाकडे सादर करू.