
मुंबई, २ जानेवारी (वार्ता.) – विश्व मराठी संमेलनात परदेशातून ५०० हून अधिक, तर भारतातून १ सहस्र प्रतिनिधी येणार आहेत. संमेलनात विदेशातील आणि परराज्यातील सर्व मराठीप्रेमींना एका व्यासपिठावर आणणार आहोत, अशी माहिती मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांनी २ जानेवारी या दिवशी मंत्रालयात पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, ‘‘६५ वर्षांत असा कार्यक्रम कुणी केला नाही. यावर्षी मर्यादित आर्थिक निधीमध्ये संमेलन करत आहेत. पुढील वेळी अधिक निधी देण्यात येईल. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी प्राप्त झालेले नवीन पुरावे आम्ही केंद्रशासनाकडे सादर करू. मराठीविषयी झालेले संशोधन, मराठी भाषेचा विश्वकोष, मराठी भाषा विभागाचे कार्य यांची संमेलनात माहिती देण्यात येईल.’’
लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे सापडले घबाड !
‘एन्.आय.टी. गोवा’ची भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित !
थोडक्यात महत्त्वाचे : ०९.०६.२०२६
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
गोव्यातील मटका जुगाराचे अन्वेषण करणारे विशेष अन्वेषण पथक बंद करण्यास याचिकाकर्त्याचा विरोध
श्री विठ्ठलमूर्ती संवर्धनासाठी रासायनिक लेपनाला विरोधच; धर्मशास्त्रानुसार लेपन करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ