सुशांतसिंह राजपूत याच्या हत्येमागील सत्य लवकरच बाहेर येईल ! – आमदार नीतेश राणे, भाजप

मुंबई – अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची हत्या झाल्याचे मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो. याचे पुरावे हळूहळू बाहेर पडत आहेत. सुशांतसिंह राजपूत याची हत्याच झाली आहे. यामागील सत्य लवकरच बाहेर येईल, असे वक्तव्य भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी केले आहे. याविषयी २ डिसेंबर याविषयी नीतेश राणे यांनी ‘ट्वीट’ही केले आहे.

केंद्रीय अन्वेषण विभागाकडून या प्रकरणाचे अन्वेषण चालू आहे. या प्रकरणी राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे निर्देश केले आहेत. काही दिवसांपूर्वी कूपर रुग्णालयातील शवविच्छेदन करणारे कर्मचारी रूपकुमार शहा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखतीत सांगितले होते की, सुशांतसिंह राजपूत यांचा मृतदेह आत्महत्या केल्याप्रमाणे वाटत नसल्याचे नमूद करून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला होता. नीतेश राणे यांनी ‘ट्वीट’समवेत व्हिडिओ पोस्ट केला असून त्यामध्ये सुशांत यांचा मृतदेह ‘स्ट्रेचर’वरून नेतांना त्यामध्ये रूपकुमार शहा दिसत आहेत.