भारतात पातिव्रत्य हीच कुटुंबसंस्थेची भक्कम आधारशीला मानल्यामुळे समाजजीवन अबाधित रहाणे, तर पाश्‍चिमात्य देशांत उन्मत्त लैंगिकता असलेल्या समाजरचनेचा आग्रह धरल्यामुळे तेथील समाज आणि समाजजीवनच उद्ध्वस्त होणे !

पावित्र्याचा सतीचा महिमा सांगणार्‍या काही अद्भुत परमोदात्त सती-कथा गुरुचरित्रात आहेत. सतीची महती अबाधित आहे. अविच्छिन्न आहे, म्हणजेच गुरुचरित्राची गुरुता (गरिमा) ही चिरंतन आणि शाश्‍वत आहे.

सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप (वय ७४ वर्षे) यांच्या देहत्यागानंतरचा आज (११.११.२०२२) तेरावा दिवस आहे, त्या निमित्ताने…

(कै.) पू. पद्माकर होनप यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या देहत्यागानंतर आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करण्यासाठी आल्यावर ‘अशक्य ते शक्य करतील स्वामी’ या वचनाची प्रचीती घेतलेल्या सौ. सोनाली पोत्रेकर !

‘मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करण्यासाठी आले. त्यानंतर माझ्यात झालेले पालट, मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती यांविषयांची माहिती पुढे दिली आहे.

गुरुपौर्णिमेनिमित्त गुजराथी भाषेत प्रवचनाची सेवा करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली कृपा !

‘एकदा गुरुपौर्णिमेच्या निमित्त गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने मला बडोदा येथे गुजराथी भाषेत प्रवचन करण्याची सेवा मिळाली. मी गुजराथी भाषेतील प्रवचनातील शब्दांचा उच्चार मराठीत लिहून सराव केला.

वादग्रस्त विनोदी कलाकार वीर दास यांचा बेंगळुरू येथील कार्यक्रम रहित !

हिंदूंच्या संघटित लढ्याचा परिणाम !

अफझलखानाच्या थडग्याजवळील अनधिकृत बांधकाम उद्ध्वस्त !  

हिंदुत्वनिष्ठांच्या २० वर्षांच्या लढ्याला यश !
पोलिसांचा चोख बंदोबस्त : परिसरात जमावबंदी लागू !

रेल्वे प्रवासात आता मिळणार सात्त्विक शाकाहारी जेवण !

रेल्वेने प्रवास करणार्‍या यात्रेकरूंना प्रवासाच्या कालावधीत आता सात्त्विक शाकाहारी जेवण मिळणार आहे. यासाठी भारतीय रेल्वेचे आस्थापन ‘आय.आर्.सी.टी.सी.’ आणि ‘इस्कॉन’ ही आध्यात्मिक संस्था यांच्यामध्ये करार झाला आहे.

ईशान्य भारताला जाणवले भूकंपाचे धक्के !

ईशान्य भारतात १० नोव्हेंबर या दिवशी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. याची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.७ एवढी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू अरुणाचल प्रदेशातील पश्‍चिम सियांग येथे होता.

‘ब्रिटन गुलामांच्या रक्तावर उभा आहे’, असे म्हणत तरुणाने ब्रिटनचे राजे चार्ल्स (तृतीय) यांच्यावर अंडी फेकली !

ब्रिटनच्या यॉर्कशायरमध्ये राजा चार्ल्स (तृतीय) यांच्यावर येथे आंदोलन करणार्‍या २३ वर्षीय तरुणाने अंडी फेकल्याने त्याला अटक करण्यात आली. ही ही अंडी चार्ल्स यांना लागली नाहीत.

केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहेत ! – उद्धव ठाकरे

संजय राऊत यांच्या जामिनाच्या वेळी न्यायालयाने अत्यंत परखडपणे आणि स्पष्टपणे काही निरीक्षणे नोंदवली आहेत. त्यामुळे केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहेत, हे जगजाहीर झाले आहे, असे वक्तव्य शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.