केजरीवाल मौलानांना प्रतिवर्षी १८ सहस्र रुपये देतात ! – केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

त्यांनी कधी हिंदूंच्या मंदिरांतील पुजारी, गुरुद्वारांतील ग्रंथी आणि चर्चमधील पाद्री यांनी १८ सहस्र रुपये मानधन दिले आहे का ?, असा प्रश्‍न केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी विचारला आहे.

ज्ञानवापी खटल्यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा समावेश होणार !

यातील एक पक्षकार असणारा ‘विश्‍व वैदिक सनातन संघ’ या खटल्याची ‘पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी’ (अटी, शर्ती यांसह देण्यात येणारा सर्वाधिकार) योगी आदित्यनाथ यांना देणार आहे.

धर्मांतर करून विवाह न केल्यास शिरच्छेद करण्याची धमकी !

शाहरुखने हिंदु सैनिकाच्या मुलीला ओढले ‘लव्ह जिहाद’च्या विळख्यात !

गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यासंदर्भात भाजप जनतेची फसवणूक करत आहे ! – केजरीवाल

असे आहे, तर केजरीवाल यांनी देहलीमध्ये समान नागरी कायदा लागू होण्यासाठी काहीच प्रयत्न का केले नाहीत ?, याविषयी त्यांनी प्रथम बोलले पाहिजे !

सेऊल (दक्षिण कोरिया) येथे हॅलोविन उत्सवात चेंगराचेंगरी : १५१ जणांचा मृत्यू

दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथे २९ ऑक्टोबरच्या रात्री हॅलोविन उत्सवाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत १५१ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, तर १५० हून अधिक जण घायाळ झाले. अनेकांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू आला.

पाकमध्ये आर्थिक संकटामुळे अराजकता निर्माण होऊन सैन्याचे शासन लागू होण्याची शक्यता ! – पाकमधील नियतकालिकाचा दावा

पाकमधील ‘द फ्रायडे टाइम्स’ या साप्ताहिकाने पाकमध्ये ६ मास किंवा त्याहून अल्पकाळासाठी सैन्याचे शासन लागू होण्याची शक्यता आहे, असे म्हटले आहे.

देहली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांना धमक्या

स्वाती मालिवाल यांनी म्हटले आहे की, माझी सुरक्षा देव करेल. अशा धमक्यांना मी भीक घालत नाही. मी सत्यासाठी बोलत राहील. धाडस असेल, तर समोर येऊन गोळ्या घाला.

हिंदूंनो, हिंदूंच्या सद्य:स्थितीचा विचार मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर न करता आध्यात्मिक स्तरावर करा !

‘मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर विचार करणार्‍यांना काळजी वाटते, ‘पुढे हिंदु अल्पसंख्यांक होणार.’ याउलट आध्यात्मिक स्तरावर विचार करणार्‍यांना कळते की, कालचक्रानुसार पुढे हिंदु धर्म असणार आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सांगलीतील शिवकवच कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाने साकारली विजयदुर्गची प्रतिकृती !

दीपावलीच्या पार्श्वभूमीवर वखारभाग येथील शिवकवच कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाने विजयदुर्गची प्रतिकृती साकारली असून दुर्ग पहाण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. सर्व कार्यकर्त्यांनी सुमारे ३०० चौरसफुटांत हुबेहूब दुर्ग साकारून समुद्रातील मराठ्यांची वीरगाथा हिंदूंच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.

कोल्हापूर शहरात युवकांच्या विविध गटांकडून गडांच्या हुबेहूब प्रतिकृतींद्वारे इतिहास जागवण्याचा प्रयत्न !

छत्रपती शिवाजी महाराज यांचा दैदिप्यमान इतिहास आजही गड-दुर्गांच्या रूपाने आपल्यासमोर आहे. हा इतिहास लोकांसमोर आणण्यासाठी कोल्हापूर शहरात विविध गटांकडून, तसेच काही वैयक्तिक स्तरावर गडांच्या हुबेहूब प्रतिकृतीद्वारे इतिहास जागवण्याचा प्रयत्न केला जात आहे.