सांगली – दीपावलीच्या पार्श्वभूमीवर वखारभाग येथील शिवकवच कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाने विजयदुर्गची प्रतिकृती साकारली असून दुर्ग पहाण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. या दुर्गावर प्रत्यक्ष असलेले २७ बुरुज, ३ तटबंदी, ४ भुयारी मार्ग, तटबंदीलगत असलेले दारू कोठार, २ धान्य कोठार, राजसदर, खलबत खाना, प्रत्येक बुरुजावर छोटे पाण्याचे हौद, प्रत्येक चार बुरुजांच्या मागे बुरुजावर सैनिकांचा विसावा यांसह असंख्य बारकावे या प्रतिकृतीत साकारण्यात आले आहेत.
ही प्रतिकृती साकारण्यात संस्थापक सर्वश्री प्रकाश निकम, प्रवीण निकम, सुदर्शन पोटादार (बटू सर) यांच्या कलाकुसर आणि मार्गदर्शनाखाली मंडळाचे सदस्य सर्वश्री पवन निकम, दीपक साठे, संदीप पाटील, सचिन देसाई, सुरेश कुडचे, श्रावण गुरव, सुभाष गिरीगौडणावर, रोहित चरणकर, बाबू तोटगी,
श्री (सौरभ) निकम यांसह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या सर्व कार्यकर्त्यांनी सुमारे ३०० चौरसफुटांत हुबेहूब दुर्ग साकारून समुद्रातील मराठ्यांची वीरगाथा हिंदूंच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.