नवी देहली – भारतीय नोटांवर श्री लक्ष्मी आणि श्री गणेश यांची चित्रे छापण्याची मागणी करणारे देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देहलीतील मौलवींना प्रतिवर्षी १८ सहस्र रुपये मानधन देत आहेत. त्यांनी कधी हिंदूंच्या मंदिरांतील पुजारी, गुरुद्वारांतील ग्रंथी आणि चर्चमधील पाद्री यांनी १८ सहस्र रुपये मानधन दिले आहे का ?, असा प्रश्न केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी विचारला आहे.
सौजन्य : Aaj Tak
ठाकूर पुढे म्हणाले की, केजरीवाल अराजकतेचे प्रतीक आहेत. स्वतःच्या सरकारकडून करण्यात आलेल्या भ्रष्टाचारावराच्या सूत्रांवरून जनतेचे लक्ष वळवण्यासाठीच त्यांनी चलनी नोटांवर देवतांची चित्रे छापण्याची मागणी केली आहे. केजरीवाल यांनी श्रीराममंदिराला विरोध केला, देवतांचा अवमान केला आणि आता अशा प्रकारची मागणी ते करत आहेत.