धर्मांतर करून विवाह न केल्यास शिरच्छेद करण्याची धमकी !

शाहरुखने हिंदु सैनिकाच्या मुलीला ओढले ‘लव्ह जिहाद’च्या विळख्यात !

आरोपी शाहरुख

फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) – सैन्यातील एका हिंदु सैनिकाच्या मुलीसंदर्भात लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले आहे. शाहरुख उपाख्य विहान नावाच्या युवकाने येथील सैनिकाच्या २२ वर्षीय मुलीला फेसबुकच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिने धर्मांतर करून विवाह केला नाही, तर तिचा आणि तिच्या भावाचा शिरच्छेद करीन, अशी धमकीही त्याने दिली. पोलिसांत शाहरुखच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

शाहरुख अमरोहा जिल्ह्यातील असून तो २४ सप्टेंबरला फिरोजाबाद येथील शिकोहाबाद येथे तरुणीला भेटण्यासाठी आला. तेव्हा त्याने तिला अमरोहा येथे नेले. या वेळी त्याने तिच्यावर धर्मांतर करून विवाह करण्यासाठी दबाव आणला. तसे केले नाही, तर तिची अश्‍लील छायाचित्रे सामाजिक माध्यमांतून प्रसारित करण्याची धमकीही त्याने दिली. पीडितेने आरोप केला आहे की, शाहरुखने तिची काही छायाचित्रे इन्स्टाग्रामवर प्रसारितही केली आहेत.

संपादकीय भूमिका

एका सैनिकाच्या मुलीलाच लव्ह जिहादच्या विळख्यात ओढण्याच्या या घटनेतून धर्मांधांची मजल कुठपर्यंत गेली आहे, हे लक्षात येते. अशांना वठणीवर आणण्यासाठी सरकारने राज्यातील लव्ह जिहाद विरोधी कायद्याची कठोर कार्यवाही केली पाहिजे !