नागपूर येथे अल्पवयीन मुलीवर धर्मांधाकडून बलात्कार !

सहा वर्षीय मुलीवर बलात्कार करणारा तालीब कमाल उपाख्य बैहरा खालीद अंसारी (वय ५३ वर्षे) याला पाचपावली पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पू. भिडेगुरुजी यांना पोलीस अनुमतीविना पालखी सोहळ्यात प्रवेश नाही ! – पुणे पोलीस आयुक्त

दोन्ही पालख्यांचे प्रस्थान झाल्यावर एकाच दिवशी त्या ‘संचेती हॉस्पिटल’ जवळून पुण्यात प्रवेश करतात. त्या वेळी रुग्णालयाजवळ पू. संभाजी भिडेगुरुजी धारकऱ्यांसहित पालखी सोहळ्यात सहभागी होतात…

भाजपचे ५, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी २ अन् काँग्रेसचा १ उमेदवार विजयी !

राज्यसभेप्रमाणेच शेवटपर्यंत अतिशय उत्कंठावर्धक ठरलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीतही भाजपने महाविकास आघाडीला धक्का देत ५ उमेदवार निवडून आणले, तर शिवसेनेचे २ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे २ उमेदवार निवडून आले आहेत.

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पुण्यात आगमन, आकुर्डी येथे मुक्काम !

पालखी सोहळ्याचे ३३७ वे वर्ष आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेली २ वर्षे पायी सोहळा होऊ न शकल्यामुळे या वेळी वारकऱ्यांच्या तोंडवळ्यावर प्रस्थान सोहळ्यात सहभागी होत असल्याचा आनंद दिसत होता.

‘वज्रलेप’ करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा नोंद करून कारवाई करावी ! – भाविक वारकरी मंडळाचे निवेदन

मंदिर समितीने घातलेले नियम आणि अटी पूर्णपणे पडताळून घेऊन ज्यांच्यासमवेत करार केला त्या संबंधितांवर, तसेच पूर्वी केलेला लेप करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा नोंद करून कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन भाविक वारकरी मंडळ यांच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

फुकाचे बोल !

अशा प्रकारे विधाने करून हिंदूंना डिवचण्याचे काम मौलाना रझा यांनी केले आहे. भारतासह विदेशातही ‘मोदी मोदी’ नावाचा गजर होत असतांना ‘असा नेता मुसलमानांनाही मिळावा’, असे कदाचित् रझा यांना वाटत असेल, तर त्यांनीच सभेला आलेल्या सर्व मुसलमानांना घेऊन हिंदु व्हावे !

लोणंद (जिल्हा सातारा) येथील वीज वितरणच्या कनिष्ठ अधिकाऱ्याला लाच स्वीकारतांना पकडले !

लाच स्वीकारणाऱ्यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे !

पिंपरी (पुणे) येथे दिंडीत भरधाव कंटेनर शिरल्याने एका वारकऱ्याचा मृत्यू !

देहू-आळंदी मार्गावरील चिखलीजवळ देहूहून आळंदीकडे पायी जात असलेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत २० जून या दिवशी भरधाव कंटेनर शिरल्याने भगवान घुगे या वारकऱ्याचा मृत्यू झाला, तर ३ वारकरी घायाळ झाले आहेत.

जळगाव येथे बनावट चावी वापरून घरात चोरी !

येथे एका घराला बनावट चावीच्या साहाय्याने उघडून सोन्याचे दागिने, तसेच रोख रक्कम असा १ लाख ५२ सहस्र रुपयांचा ऐवज चोरीस गेला. सीसीटीव्ही कॅमऱ्याचे चित्रण पडताळल्यावर एका नातेवाइकाने ही चोरी केल्याचे उघडकीस आले.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये १० टक्के पाणीसाठा शेष !

मुंबईला पाणीपुरवठा होणाऱ्या धरण क्षेत्रात लवकरच समाधानकारक पाऊस पडला नाही, तर यंदा मुंबईकरांना पाणी कपातीच्या संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. या धरणांमध्ये सध्या केवळ १० टक्के पाणीसाठा शेष आहे.