पिंपरी (पुणे) येथे दिंडीत भरधाव कंटेनर शिरल्याने एका वारकऱ्याचा मृत्यू !

पिंपरी (जिल्हा पुणे) – येथील देहू-आळंदी मार्गावरील चिखलीजवळ देहूहून आळंदीकडे पायी जात असलेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत २० जून या दिवशी भरधाव कंटेनर शिरल्याने भगवान घुगे या वारकऱ्याचा मृत्यू झाला, तर ३ वारकरी घायाळ झाले आहेत. या प्रकरणी भास्कर जायभाये यांनी तक्रार दिली आहे. देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून जगन्नाथ मुंडे या कंटेनर चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.