पू. भिडेगुरुजी यांना पोलीस अनुमतीविना पालखी सोहळ्यात प्रवेश नाही ! – पुणे पोलीस आयुक्त

पू. भिडेगुरुजी

पुणे – संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी लाखो वारकरी आळंदी आणि देहू येथे आले आहेत. दोन्ही पालख्यांचे प्रस्थान झाल्यावर एकाच दिवशी त्या ‘संचेती हॉस्पिटल’ जवळून पुण्यात प्रवेश करतात. त्या वेळी रुग्णालयाजवळ पू. संभाजी भिडेगुरुजी धारकऱ्यांसहित पालखी सोहळ्यात सहभागी होतात; मात्र यंदा पू. भिडेगुरुजींना पोलीस अनुमतीविना पालखी सोहळ्यात सहभागी होता येणार नाही, असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले आहे.