जळगाव येथे बनावट चावी वापरून घरात चोरी !

१ लाख ५२ सहस्र रुपयांच्या ऐवजाची चोरी !

प्रतिकात्मक छायाचित्र

जळगाव – येथे एका घराला बनावट चावीच्या साहाय्याने उघडून सोन्याचे दागिने, तसेच रोख रक्कम असा १ लाख ५२ सहस्र रुपयांचा ऐवज चोरीस गेला. सीसीटीव्ही कॅमऱ्याचे चित्रण पडताळल्यावर एका नातेवाइकाने ही चोरी केल्याचे उघडकीस आले. यात त्या नातेवाइकाला अटक करण्यात आली आहे. कल्पना अनिल कुलकर्णी यांच्या घरी ही चोरी झाली आहे.