आज इयत्ता दहावीचा निकाल घोषित होणार !

दहावीच्या परीक्षेसाठी १६ लाख ३८ सहस्र ९६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. हा निकाल http://www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर घोषित करण्यात येणार आहे.

पुण्यात वारकऱ्यांच्या निवासासाठी अवघे २ मंडप !

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे या वर्षी आषाढी वारी मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले; मात्र पुण्यामध्ये वारकऱ्यांच्या निवासासाठी अवघे दोनच मंडप टाकण्यात आले आहेत.

महाराष्ट्र पोलिसांचा मौलानांशी संवाद साधून निदर्शने टाळण्यासाठी प्रयत्न

पोलिसांची गांधीगिरी ! असे ‘संवाद’ साधून किती दंगली रोखल्या गेल्या आहेत का ? कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाईच केली पाहिजे !

ईडीच्या विरोधात काँग्रेसच्या मंत्र्यांसह कार्यकर्त्यांचा मोर्चा !

जनतेची कामे करायची सोडून मोर्चा काढून आरोपींना पाठीशी घालणारे लोकप्रतिनिधी काय कामाचे ?

आषाढी वारीमध्ये पाणी, स्वच्छता आणि सुरक्षा यांवर भर द्यावा ! – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

आषाढी वारीसाठी विविध जिल्ह्यांतून, तसेच इतर राज्यांतूनही लाखो भाविक पंढरपुरात येतात. वारी कालावधीत येणाऱ्या भाविकांसाठी पाणी, स्वच्छता आणि सुरक्षा यांवर भर देण्याच्या सूचना अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केल्या आहेत.

शालेय शुल्कवाढीच्या विरोधात शिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करण्याची पालकांना मुभा !

प्रतिवर्षी खासगी शाळा मनमानी पद्धतीने शुल्कवाढ करतात आणि पालकांना हतबल व्हावे लागते, यावर सरकारने कायमचा तोडगा काढावा !

श्री महालक्ष्मी मंदिराच्या दानपेटीत ८३ लाख रुपयांचे दान !

श्री महालक्ष्मी मंदिरात भाविकांनी दिलेल्या दानपेटीतील दानाची मोजणी करण्यात आली. १४ जून या दिवशी ३६ लाख ३१ सहस्र २०० रुपये, तर १५ जून या दिवशी उर्वरित पेट्यांमधून ४७ लाख ४३ सहस्र ४६४ रुपयांचे दान मिळाले. दोन दिवसांची एकूण रक्कम ८३ लाख ७४ सहस्र ६६४ रुपये झाली.

जी.आय.एस्. मॅपिंगसाठी नेमलेल्या आस्थापनांना पावणेतीन कोटी रुपयांचा दंड !

शहरातील मिळकतकराची माहिती घेण्यासाठी आस्थापनांनी चुकीच्या पद्धतीने काम केल्याने अनेक मिळकतधारकांची ४० टक्केची सवलत रहित झाली आहे. यामुळे नागरिकांना मिळकत कराची ज्यादा रकमेची देयके आल्याने महापालिका प्रशासनावर प्रचंड टीका होत आहे.

शिवसेनेचा वर्धापनदिन यंदाही ‘ऑनलाईन’ ! – संजय राऊत, खासदार

कोरोनामुळे शिवसेनेचा वर्धापनदिन मागील २ वर्षांप्रमाणे याही वर्षी १९ जून या दिवशी ‘ऑनलाईन’ पद्धतीने साजरा होणार आहे, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.

‘अग्नी’मय पथ !

हिंसाचार केलेल्या युवकांवर गुन्हे नोंदवून त्यांना ‘अग्नीवीर’ बनण्यापासून रोखायला हवे. जे युवक स्वार्थासाठी देशाच्या मालमत्तेची हानी करू पहातात, ते ‘अग्नीवीर’ बनून कोणते देशहित साधणार आहेत ? त्यासाठी त्यांची पात्रता आहे का ? ‘अग्नीवीर’ हे देशाचे वीरपुत्र असले पाहिजेत, जे नीच स्वार्थासाठी नाही, तर देशाची एकता आणि अखंडता यांसाठी झगडतील !