शालेय शुल्कवाढीच्या विरोधात शिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करण्याची पालकांना मुभा !

मुंबई – शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक-शिक्षक कार्यकारी समिती यांची मान्यता न घेता खासगी शाळांनी शुल्कवाढ केलेली असल्यास या विरोधात पालक आता संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करू शकतात. यामुळे अशा शाळांवर पुढे कारवाई केली जाणार आहे. राज्यात शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होताच खासगी शाळा व्यवस्थापनाने २० ते ३५ टक्के शुल्कवाढ केली आहे. (विनाकारण शुल्कवाढ करणाऱ्या शाळांची मान्यता रहित का करण्यात येऊ नये ? – संपादक) शालेय विभागाने त्याची नोंद घेतली असून शुल्कवाढ करणाऱ्या शाळांविरोधात पालकांनी तक्रार केल्यानंतर शुल्क अधिनियमातील तरतुदीनुसार त्यांच्यावर तातडीने कारवाई केली जाणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

संपादकीय भूमिका 

प्रतिवर्षी खासगी शाळा मनमानी पद्धतीने शुल्कवाढ करतात आणि पालकांना हतबल व्हावे लागते, यावर सरकारने कायमचा तोडगा काढावा !