महाराष्ट्र पोलिसांचा मौलानांशी संवाद साधून निदर्शने टाळण्यासाठी प्रयत्न

पोलिसांचा ‘सायबर सेल’ प्रतिदिन हटवत आहे ५० पोस्ट्स

मुंबई – भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा आणि ज्ञानव्यापी यांविषयी १० जून या दिवशी देशभरात हिंसाचार झाला. असा प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी महाराष्ट्र पोलीस सतर्क झाले आहेत. ‘पोलिसांच्या ‘सायबर सेल’कडून प्रतिदिन ५० पोस्ट्स हटवल्या जात आहेत. यातून सामाजिक प्रसारमाध्यमांवर हिंसेला प्रोत्साहन देण्याचा हेतू नष्ट करता येईल’, असे ‘सायबर सेल’चे पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी सांगितले.
महाराष्ट्र पोलीस सातत्याने मौलवींशी संपर्क साधत आहेत. त्याद्वारे ‘शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर सर्वांनी शांतपणे घरी जावे’, असे आवाहन मौलानांनी करण्याविषयी सांगितले जात आहे. १० जून या दिवशी संभाजीनगर, सोलापूर, जालना आणि कोल्हापूर येथे मुसलमान रस्त्यावर उतरले होते. सर्वच ठिकाणाचा जमाव पहाता पोलिसांचा बंदोबस्त अल्प पडला होता. (याला राज्याच्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश म्हणायचे कि पोलिसांची अकार्यक्षमता ? – संपादक)

संपादकीय भूमिका 

  • हिंसाचार करणाऱ्यांना आणि तो करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्यांना तत्परतेने कडक शासन झाले, तरच शांतता नांदेल !
  • पोलिसांची गांधीगिरी ! असे ‘संवाद’ साधून किती दंगली रोखल्या गेल्या आहेत का ? कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाईच केली पाहिजे !