गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमीष दाखवून सेवानिवृत्त शास्त्रज्ञाची फसवणूक !
गुंतवणुकीवर ज्यादा परताव्याचे आमीष दाखवून उच्चशिक्षित दांपत्याने सेवानिवृत्त शास्त्रज्ञाची १ कोटी ५६ लाख ५२ सहस्र रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात जितेंद्र शेडगे आणि प्रीती शेडगे यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.