
कोल्हापूर, १६ जून (वार्ता.) – श्री महालक्ष्मी मंदिरात भाविकांनी दिलेल्या दानपेटीतील दानाची मोजणी करण्यात आली. १४ जून या दिवशी ३६ लाख ३१ सहस्र २०० रुपये, तर १५ जून या दिवशी उर्वरित पेट्यांमधून ४७ लाख ४३ सहस्र ४६४ रुपयांचे दान मिळाले. दोन दिवसांची एकूण रक्कम ८३ लाख ७४ सहस्र ६६४ रुपये झाली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवडे, व्यवस्थापक महादेव दिंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली ३५ कर्मचारी ही रक्कम मोजण्यात सहभागी झाले होते. या मोजणीसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
कागल शहरातील वृक्षांची मूक हत्या थांबवा ! – हिंदु विधीज्ञ परिषदेचे कागल नगर परिषद येथे निवेदन
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !