दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात १७ जून या दिवशी चर्चिले जाणारे विषय

उद्बोधन सत्र : विदेशी हिंदूंचे रक्षण, ईशान्य भारत आणि विदेशी हिंदू यांचे रक्षण,दैवी बालकांविषयी संशोधन

भौतिक विकासापेक्षा आत्मिक विकास श्रेष्ठ !

‘नागरिकांच्या आध्यात्मिक उन्नतीवरून राष्ट्राच्या विकासाचे मोजमापन केले जायला हवे; कारण भौतिक विकास कितीही झाला आणि आत्मिक (किंवा नैतिक) विकास साध्य झाला नाही, तर त्या भौतिक विकासाला काय अर्थ आहे ?’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या तृतीय दिवसाचे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण

१४.६.२०२२ या दिवशी गोवा येथील ‘श्री रामनाथ देवस्थाना’मध्ये दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या तृतीय दिवशी अधिवेशनाला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनाच्या वेळी श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.

‘गुरुकृपायोग’ म्हणजे परात्पर गुरुदेवांच्या रूपातील ‘जगन्माते’च्या मातृवात्सल्य भावाने ओतप्रोत असलेली ‘मातृसंहिता’ !

वेदशास्त्र यज्ञयागादी कर्मकांडांवर केंद्रित आहे. स्मृती आणि उपनिषदे यांत ज्ञानयोगाविषयी मार्गदर्शन असल्यामुळे त्यांस ‘ब्रह्मविद्या’, असे संबोधतात. इतिहास आणि पुराणे यांच्या माध्यमातून ईश्वरी अवताराच्या दैवी लीला वर्णिल्या गेल्याने त्यांच्या श्रवणातून भक्तीभाव निर्माण होतो.

‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’मध्ये सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी केलेले नामजपादी उपाय

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करणे, म्हणजे ‘रामराज्य स्थापन’ करण्यासाठी प्रयत्न करणे ! या कलियुगात असे प्रयत्न करणे कठीण आहे. यासाठी वाईट शक्तींविरुद्ध लढा द्यावा लागतो. दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनामध्ये कशा बुद्धीअगम्य अडचणी आल्या आणि त्यांवर नामजपादी उपायांनी कशी मात केली ? हे येथे दिले आहे.

गुरुपौर्णिमेला २६ दिवस शिल्लक

बिंब-प्रतिबिंब न्यायाने शिष्याच्या मनातील, गुरूंनी काय करावे, याबद्दलच्या विचारांचे (बिंबाचे) प्रतिबिंब गुरूंच्या मनात उमटून त्यांना शिष्याचे विचार कळतात. ते विचार शिष्याच्या उन्नतीसाठी पोषक असल्यास गुरु त्यानुसार वागतात.