मुंबई – इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल १७ जून या दिवशी दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने घोषित करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे. दहावीच्या परीक्षेसाठी १६ लाख ३८ सहस्र ९६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. हा निकाल http://www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर घोषित करण्यात येणार आहे.
ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येतील. याविषयीची सविस्तर माहिती, अटी, शर्ती https://t.co/g7ZbJdsffV या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.